फोटो : NSK26H28164
नंदुरबार : हितवर्धक संस्थेतर्फे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
----------------------------
नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेतर्फे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजातील विविध मान्यवर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. या वेळी प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून कर अधिकारी नरेंद्र खोंडे, मनोहर खोंडे, कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि ज्ञानदीप अकॅडमीचे निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी ललित बोरसे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शशिकला सोनवणे होत्या. महिला जिल्हाध्यक्ष जयश्री निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव हिमांशू बोरसे यांनी आभार मानले.
दिवंगत पवार यांना
‘समाजभूषण’ पुरस्कार
नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेतर्फे स्व. गुलाबराव पवार यांना मरणोत्तर ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमात निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंकज भदाणे, अरविंद निकम, हिमांशू बोरसे, नितीन मंडलिक, शिवाजी मिस्त्री, छगन भदाणे, सुधीर निकम, नरेंद्र महाले, प्रकाश देवरे, शशिकला सोनवणे, मीनाक्षी भदाणे, जयश्री निकम, अनिता सूर्यवंशी, नीलिमा चित्ते, मनीषा निकम, छगन सूर्यवंशी, एकनाथ चित्ते, गजेंद्र जाधव, विजय सोनवणे, विजय सैंदाणे, प्रभाकर चित्ते, प्रभाकर बोरसे, ओंकार शिरसाठ, ज्ञानेश्वर शिरसाट, समाधान सैंदाणे, भाईदास बोरसे, जीवन जाधव, प्रवीण वरसाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रकाश सोनवणे, अनिल भदाणे, नितीन भदाणे, राहुल ठाकरे, लक्ष्मीकांत निकम, रोहित भदाणे, लक्ष्मीकांत जाधव, कैलास ढवळे, अर्जुन महाले, अमित सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, मयूर सूर्यवंशी, गणेश पवार, प्रकाश सैंदाणे, प्रभाकर शिरसाट, नरेंद्र खोंडे, जितेंद्र शिरसाट, संदीप सोनवणे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.