फोटो : NSK26H28167/ NSK26H28176
नंदुरबार : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रिंकी पावराचा सत्कार करताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी आदी. दुसऱ्या छायाचित्रात सत्कारार्थी खेळाडूंसमवेत मान्यवर.
--------------------
जीटीपी महाविद्यालयात
गुणवंत खेळाडूंचा गौरव
नंदुरबार, ता. १ : येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी होते.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयामार्फत सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रिंकी पावरा या विद्यार्थीनीचा विशेष सत्कार केला. प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी दररोज थोडावेळ खेळासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा, असा संदेश दिला. नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य प्रा. एस. पी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, उपप्राचार्य प्रा. डी. ए. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. एम. एस. वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. घाटे यांनी आभार मानले.