फोटो : NSK26H28181
नंदुरबार : येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मुख्याध्यापक प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, सुनील शाह, राजेश शाह, जगदीश पाटील, दिनेश ओझा, जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे, राहुल वडनेरे.
------------------------
खेळामुळे आत्मविश्वास वाढतो
राजेश शाह : विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण व संघ भावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व द्यावे, असे आवाहन माजी उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास व खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने श्रॉफ हायस्कूलमध्ये क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रशांत बागूल होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी पर्यवेक्षक जगदीश पाटील, माजी क्रीडा शिक्षक दिनेश ओझा उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. धावणे, रस्सीखेच, लिंबू- चमचा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थी विरुद्ध शिक्षक रस्सीखेच स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. या वेळी उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक सुनील शाह आदी उपस्थित होते. जगदीश वंजारी, मनीष सनेर व हेमचंद्र मराठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. राहुल वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले.