तालुका औद्योगिक वसाहत

तालुका औद्योगिक वसाहत
Published on
पान-२ सिन्नर ॲंकरला पुरवणी लेखाच्या कालसारख्या स्टाईलने वापरणे -------------- फोटो - NSK26H28292 सिन्नर : येथील औद्योगिक सहकारी वसाहत कार्यालय. -------------- सहकारी औद्योगिक वसाहचीमुळे सिन्नरच्या अर्थकारणास वेग ------------------------- एकेकाळी दुष्काळी आणि केवळ विडी उद्योगाचे केंद्र म्हणून परिचित असलेला सिन्नर तालुका आता ''औद्योगिक हब'' म्हणून ओळखला जातो. या ऐतिहासिक परिवर्तनाचा पाया रचण्याचे श्रेय ‘सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, सिन्नर (स्टाईस)’ या संस्थेला जाते. सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक विकास कसा साध्य करता येतो, याचे ''स्टाईस'' हे देशातील एक सर्वोत्तम आणि यशस्वी उदाहरण आहे. - संपत ढोली, सिन्नर. --------------- सि न्नर तालुक्यात औद्योगिकरणाची सुरुवात आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुसळगाव शिवारात (स्व.) सूर्यभानजी गडाख, स्व. किसनराव चव्हाणके व स्व. प्रकाशशेठ शहा यांनी १९८२ मध्ये सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. सुरुवातीला मोजक्या लघुउद्योगांसह सुरू झालेल्या या वसाहतीने अत्यंत खडतर प्रवास पार केला. उद्योजकांना पायाभूत सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. हळूहळू या वसाहतीचा विस्तार होत गेला आणि ती ''स्टाईस'' या नावाने नावारूपास आली. सध्याचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष प्रमोद महाजन व त्यांचे सहकारी संचालक मंडळामुळे ही वसाहत भविष्यात केवळ नाशिक जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे औद्योगिक वैभव ठरणार आहे. आज ''स्टाईस'' ही केवळ एक औद्योगिक वसाहत राहिलेली नसून, तो एक महाकाय औद्योगिक परिवार बनला आहे. सध्या या वसाहतीच्या कार्यक्षेत्रात ३८५ पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल्स, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. ''स्टाईस'' मधील उद्योगांच्या माध्यमातून दरवर्षी शासनाला साधारणपणे २,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटीचा महसूल मिळतो. ही बाब या वसाहतीची आर्थिक ताकद दर्शवते. वसाहतीत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, वीज उपकेंद्र, उत्तम दळणवळणाचे रस्ते, एटीएम आणि महा ई-सेवा केंद्र यांसारख्या अत्याधुनिक सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. ''स्टाईस'' च्या स्थापनेमुळे सिन्नर तालुक्यात अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक बदल घडून आले आहेत. विद्यमान संचालक मंडळ ''स्टाईस'' ला अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नातून वसाहतीमधील ९८ उद्योगांसाठी ५ लाख लिटर क्षमतेच्या सामान्य सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास भुवनेश्वरच्या आयआयटीकडून मंजुरी मिळवून घेतली आहे. यामुळे उद्योगांमधील प्रदूषणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. नवीन गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महावितरण आणि एमआयडीसीसोबत समन्वय साधून पायाभूत सुविधा अधिक बळकट करत आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com