स्वाध्याय परिवारातर्फे
पथनाट्यातून जनजागृती
नाशिक : श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने स्वाध्याय परिवारातील युवा वर्गातर्फे ठिकठिकाणी ६ सप्टेंबरपर्यंत पथनाट्यातून जनजागृती करण्यात येणार आहे. ‘हमने है माखन पाया’ या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादरीकरण केले जाईल. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून आणि परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पथनाट्यातून समाजात विविध विषयांवर जागर करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही देशभरातील १५ राज्य तसेच अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह १५ देशांमध्ये १७ हजार युवकांच्या पथकांमार्फत हे पथनाट्य सादर केले जाईल. त्यामध्ये साधारणत: दोन लाख युवक सहभागी होतील, अशी माहिती स्वाध्याय परिवारातर्फे देण्यात आली.
------
वारकरी संप्रदाय
जिल्हाध्यक्षपदी कापसे
नाशिक : वारकरी संप्रदायाच्या जिल्हाध्यक्षपदी निवृत्ती महाराज कापसे गणेशगावकर यांची निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर आणि सचिव पुंडलिक थेटे यांनी कापसे यांच्या निवड जाहीर केली. कापसे महाराज यांच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भरत महाराज वाघ, श्याम गायकर, दिनकर खांडबहाले, पांडुरंग गडकरी, सतीश आलय, संजय गोडसे यांच्यासह सर्व वारकरी मंडळींनी अभिनंदन केले आहे.
फोटो क्रमांक : एच-28345