NSK26H28319
जळगाव : क्रीडा दिनानिमित्त सिद्धिविनायक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी डॉ. अमृता सोनवणे, विशाल फिरके, विजय न्हावी, आर. पी. खोडपे, अनिल माकडे व खेळाडू.
––––––
सिद्धिविनायक विद्यालयात
राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : जुन्या औद्योगिक वसाहतमधील सिद्धिविनायक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सुरवातीला हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडू डॉ. अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू विजय न्हावी, विशाल फिरके, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, क्रीडा शिक्षक अनिल माकडे यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते.
क्रीडा दिनानिमित्त विद्यालयातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्नील महाजन, रोहित नवले, देवेश पाटील, महेश पाटील, भावेश सोनवणे, साहिल बिडकर, विवेक पाटील, तेजस्विनी झांजे, कल्याणी बोरसे, रितिका महाजन, अमृता पवार, तन्मय डोळे, ओम गायकवाड, निखिल पाटील, अनमोल तेलंग, यांच्यासह विद्यालयातील राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
––