तांबापुऱ्यात ईद निमित्त

तांबापुऱ्यात ईद निमित्त
Published on
NSK26H28189 जळगाव : ईद-ए-मिलाद-ऊन-नबी’निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिरात रक्तदान करताना तांबापुरातील आशिक ए रुसूल आदी. --------- तांबापुरातील शिबिरात १५१ जणांचे रक्तदान शहरात ईदनिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद साहेब यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी करण्यात आली. तांबापुरा येथील शाह-ए-औलिया मशीद ट्रस्टतर्फे हनीफ अली शाह बापू यांच्या मार्गदर्शनाखाली व धर्म गुरु पेश इमाम ओवैस मदनी साहब यांच्या नेतृत्वात शोभायात्रा काढण्यात आली. मदिना चौकातून निघालेली यात्रा विविध मार्गांवरून पुन्हा मदिना चौकात पोहोचली. देशात सुख-शांती, चांगला पाऊस व सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी मौलाना जुबेर आलम व तौफिक शाह बापू यांनी विशेष प्रार्थना करून यात्रेचा समारोप केला. यावेळी नागरिकांनी एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. शोभायात्रेसाठी आसिफ शाह, तौफिक शाह, मुखतार शाह, वसिम अत्तारी, मुस्तकीम शेख, हुसनोद्दीन काकर, शफी शेख, शाहिद कुरेशी, रईस खाटीक, हमीद मौलाना व अफझल शाह रब्बानी यांनी सहकार्य केले. अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशनतर्फे शहीद अब्दुल हमीद चौकात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १५१ हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. गरजू ३० जणांना मजीद जॅकेरियातर्फे मोफत चष्मे, तर १४ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पीर हुरे मलंग शाह बाबा दर्गा ट्रस्टतर्फे सर्वधर्मीय भंडारा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com