टुडे ४ ॲंकर शहर -जिल्ह कॉमन
लोगो : नवतंत्राच्या साथीने कापसाची शेती (लोगो आजच्या टुडे ४ मधून घ्यावा)
---------------------
शीर्षक
कापसाचे उत्पादन वाढले तरच जीनिंगला उभारी
उपशीर्षक
एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन देणाऱ्या आधुनिक बियाण्यांची गरज
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : शेतकऱ्यांना किमान १० ते १२ क्विंटल प्रतिएकर उत्पादन देणाऱ्या कापसाचे बियाणे उपलब्ध झाले तर जीनिंग व्यवसाय पुन्हा उभारी घेईल. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढेल व खर्च कमी होईल. उत्पादन वाढीसाठी शासनाने ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे सकारात्मक पाऊल असले तरी जगात बीजी ७ तंत्रज्ञान आले असताना आपण ‘बीजी २’ वर अडकून पडलो आहोत.
आपण देशी वाणावर खर्च करीत आहोत. गुजरातमधील शेतकरी मान्यता नसलेले बीजी ४ बियाणे वापरून गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादन घेत आहेत. खानदेशात सुद्धा अनेक शेतकरी ते बियाणे वापरून भरपूर उत्पादन घेतात. अशा आधुनिक बियाण्याला मान्यता देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर जीनिंग व्यवसाय सुद्धा प्रगती करेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल.
‘जीनिंग’ अडचणीत
एकरी उत्पादन ३ ते ४ क्विंटल इतके कमी झाल्याने जिल्ह्यातील १५० पैकी ५० देखील जिनिंग व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालविता येत नाहीत. २५ लाख गाठी तयार करण्याची क्षमता कारखान्यांची आहे. मात्र पुरेसा कापूस मिळत नसल्याने फक्त ८ लाख गाठी तयार होतात, असे खानदेश जीनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.
उत्पादन वाढीचे असे आहेत उपाय
माती परीक्षण : माती परीक्षण केल्याने कोणती व किती प्रमाणात खते द्यावीत याचे ज्ञान होऊन खते योग्य मात्रेत देता येतील.
संतुलित खत व्यवस्थापन : नत्र. स्फूरद, पालाश बरोबर सल्फर, झिंक, बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून उत्पादन वाढू शकते.
ठिबक सिंचन : फक्त पाण्याची बचतच नाही तर कायम वाफसा स्थिती राहून पीक जोमदार राहण्यासाठी ठिबक सिंचन उपयोगी आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन : फेरोमन ट्रॅप, पिवळे चिकट सापळे, जैविक कीट नियंत्रण व योग्य वेळी फवारणी केल्याने पीक निरोगी राहते.
योग्य वेचणी : स्वच्छ कापसाला बाजारात जास्त भाव मिळतो. त्यासाठी वेळेवर वेचणी व स्वच्छ कापूस वेचणी महत्वाची ठरते.
चौकट
नव्या तंत्रज्ञानाचा वापर
दोन ओळीत व दोन झाडातील अंतर कमी करून झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढीकडे शेतकरी वळत आहेत. अनेक शेतकरी तरुण ड्रोन फवारणी व्यवसायात आले असून २०२५ च्या हंगामात सुमारे १ हजार एकर कापसाच्या क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली होती.