धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 27889
धुळे : देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित लेफ्टनंट सलोनी बोरसे. शेजारी प्राध्यापक, विद्यार्थिनी.
--
सैन्यात युवतींनी देशसेवेचा वारसा जोपासावा
--
लेफ्टनंट सलोनी बोरसे : देवरे अभियांत्रिकीत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : भारतीय सैन्य दलात महिला अभियंत्यांना विविध विभागांतर्गत सुवर्णसंधी उपलब्ध असून युवतींनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन देशसेवेचा वारसा जोपासावा, असे आवाहन भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट सलोनी सुकलाल बोरसे यांनी केले.
बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. २०२३ बॅचच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या सलोनी बोरसे यांच्या या विशेष कार्यक्रमास विद्यार्थिनींचा प्रतिसाद लाभला. त्यांनी प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, प्रशिक्षण केंद्रांची माहिती, प्रशिक्षणाचे खडतर अनुभव आणि विपरित नैसर्गिक परिस्थितीत काम करण्याचे विलक्षण प्रसंग विद्यार्थिनींसमोर मांडले. प्राचार्य हितेंद्र पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख एस. डी. सूर्यवंशी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख इंद्रभान बोरसे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा मेधा जोशी, सचिव संगीता राजपूत, सुरेखा पाटील, पूजा पाटील, संयोजन समितीच्या सदस्या वैशाली हिरे, दिपाली भामरे, पल्लवी साळुंके, दिपमाला पाटील, हर्शिता सांगळे, भारती पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात लेफ्टनंट सलोनी बोरसे यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य पाटील यांनी अभियंता युवतींना सैन्य दलातील करिअर संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. सूर्यवंशी यांनी आभार मानले.
--