धुळे : टुडे पान ३ साठी.. अँकर ... शिल्लक बातमी
--
फोटो क्रमांक : 27897
धुळे : पालेशा महाविद्यालयात स्वागत करूया उतारवयाचे या कार्यशाळेवेळी उपस्थित नितीन ठाकूर, प्रभाकर महाले, डॉ. संजय संघवी, केदार नाईक आदी.
--
पालेशा महाविद्यालयात स्वागत करूया उतारवयाचे कार्यशाळा
--
ज्येष्ठ महिला नागरिकांच्या आरोग्याविषयी व हक्काविषयी धुळ्यात विशेष मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : जळगावस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा. ध. पालेशा वाणिज्य व कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी ‘स्वागत करूया उतारवयाचे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात झाली. ज्येष्ठ महिलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबद्दल जनजागृती करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्राचार्य प्रभाकर महाले अध्यक्षस्थानी होते. हेमंत जोशी यांनी प्रास्ताविक केले. रक्षंदा जाधव यांनी परिचय करून दिला. प्राचार्य महाले म्हणाले, बदलत्या काळानुसार ज्येष्ठ महिलांनी स्वतःला अपडेट ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या सत्रांमध्ये विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात कन्सल्टंट फिजिशियन व अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. संजय संघवी यांनी वृद्धापकाळात परावलंबी न राहता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि मधुमेह, हृदयविकार यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रात केदार नाईक यांनी विविध खेळ, श्वासावर नियंत्रण, एकाग्रता आणि संगीत- थेरपीच्या माध्यमातून मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात धुळे व जळगावच्या बालकल्याण सदस्य ॲड. अनिता भांबेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, निर्वाहाचा हक्क, मृत्युपत्र आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रात सिस्टर इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहशिक्षिका रेवती पागे यांनी घरातील ज्येष्ठ व्यक्ती हा कुटुंबाचा भार नसून आधारस्तंभ व ‘जिवंत ग्रंथ’ असल्याचे विचार मांडले. कार्यशाळेच्या समारोप सत्रात विणा चौधरी, जयश्री शाह, रेखा बारी व सुमन पाटील या महिलांनी मनोगत व्यक्त केले. विजय वानखेडे यांनी आभार मानले. अंबिका जानकर, पल्लवी नेमाने, सुष्मिता खैरनार, नेहा सोनार आणि विशाखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
--