रोटरी ऐकण्याची, पाहण्याची
नव्हे तर अनुभवण्याची गरज
डॉ. रश्मी शर्मा : गणपतीनगरात नूतन सदस्यांचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : रोटरी ही संस्था केवळ ऐकण्याची किंवा पाहण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भुसावळ येथील डॉ. रश्मी शर्मा यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये ‘मेंबरशिप अँड न्यू क्लब डेव्हलपमेंट मंथ’निमित्त नवीन सदस्य स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. शर्मा बोलत होत्या. व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके, मानद सचिव दीपक नाथानी आणि मेंबरशिप कमिटी चेअरमन विपुल पारेख उपस्थित होते. या वेळी प्रा. शिवानी देशमुख आणि प्राची चौधरी यांना डॉ. शर्मा यांच्या हस्ते रोटरीचे सदस्यत्व व पिन प्रदान करण्यात आले. संघटनेच्या कार्यासाठी नवीन सदस्यांची आवश्यकता असून, महिला सदस्यांच्या बहुआयामी व मल्टिटास्किंग व्यक्तिमत्त्वाचा संस्थेला मोठा फायदा होतो, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. नवीन सदस्यांना रोटरीच्या माध्यमातून, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे लाभ मिळत असतात. सदस्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. नवीन सदस्यांच्या कार्याची माहिती विपूल पारेख यांनी दिली. पल्लवी ढाके यांनी स्वागत केले. राजेश चौधरी यांनी परिचय करून दिला, तर ॲड. रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.