शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार ६८५ महिला गोविंदांचा सहभाग; प्रत्येक गोविंदाचा १० लाखांचा अपघाती विमा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार
६८५ महिला गोविंदांचा सहभाग; प्रत्येक गोविंदाचा १० लाखांचा अपघाती विमा
Published on
सेकंड मेन (फोटो महिलांच्या दहीहंडीचे एआय चित्र वापरावे) --- शिवतीर्थावर शनिवारी युवतींच्या दहीहंडीचा थरार शहरातील ६८५ महिला गोविंदांचा सहभाग; २१३ ढोलवादकांचा दणदणाट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३१ : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनतर्फे ‘युवतींची दहीहंडी २०२६’ हा उपक्रम शनिवारी (ता. ५) सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊदरम्यान शिवतीर्थ मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. नारीशक्तीचा गजर, दहीहंडीचा थरार या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात शाळा-महाविद्यालयांतील १५ संघांच्या तब्बल ६८५ महिला गोविंदा सहभागी होणार आहेत. युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार यावेळी अनुभवता येणार असून, सहभागी प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून काढण्यात आला आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम दहीहंडीच्या थरारासोबत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमही होणार आहेत. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोलपथकांतील तब्बल २१३ ढोलवादक वादन साद करणार आहेत. मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाइव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी ही कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे असतील. शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही या उत्सवात सहभाग राहणार आहे. युवतींच्या सामर्थ्याला व्यासपीठ संस्कृतीची जाण, उत्सवाची शान या भावनेतून आयोजित या उपक्रमाचा उद्देश युवतींच्या सामर्थ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सण-उत्सवांमध्ये युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस आणि निर्णयक्षमता वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चौकट प्रवेश विनामूल्य महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी’ अशी ओळख निर्माण केलेल्या या उपक्रमाचा आनंद जळगावकरांना घेता येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला आणि उत्साहाला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com