तीन पिढ्यांचा क्रीडा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे स्पोर्ट्स फेस्टिव्हल; ४०० सदस्यांचा सहभाग

तीन पिढ्यांचा क्रीडा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग
रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे स्पोर्ट्स फेस्टिव्हल; ४०० सदस्यांचा सहभाग
Published on
तीन पिढ्यांचा क्रीडा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग रोटरी रॉयल्सतर्फे स्पोर्ट्स फेस्टिव्हल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३१ : मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळांपासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला क्रीडेकडे वळविण्यासह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीच्या खेळांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्सतर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन दिवसीय ‘रोटरी स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले. शहरातील रोटरीच्या सर्व १३ क्लबमधील सुमारे ४०० सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण प्रेसिडेंट एन्क्लेव्हचे दिलीप गांधी व राजीव बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष ॲड. सचिन मराठे, प्रशासकीय सचिव जितेंद्र लाल, प्रकल्प सचिव गिरीश शिंदे, स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन पयोद बेहेडे, व्हाइस चेअरमन विष्णू वर्मा, सचिन जेठवाणी यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. फेस्टिव्हलमध्ये कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन आणि लुडो या खेळांचा समावेश होता. विविध वयोगटांत एकेरी, महिला-पुरुष तसेच मिश्र दुहेरी प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुले, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतल्याने क्रीडांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमात तीन पिढ्यांनी एकत्र खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला, असे ॲड. सचिन मराठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com