पर्यायी रस्ते अपुरे, मुख्य मार्ग बंद; संतापलेल्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

पर्यायी रस्ते अपुरे, मुख्य मार्ग बंद; संतापलेल्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
Published on
मेन फिचर टुडे एक --- NSK26H28348 जळगाव : महामार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामाबाबत ‘न्हाई’च्या अधिऱ्यांना जाब विचारताना उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक अमर जैन, नगरसेवक नरेंद्र पाटील आदी. --- NSK26H28350 मानराज पार्कजवळील महामार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद केलेला रस्ता. --- पर्यायी रस्ते अपुरे, मुख्य मार्ग बंद; संतप्त नगरसेवकांचा ‘ठिय्या’ मानराज पार्क-खोटेनगर महार्गावर काँक्रिटीकरण सुरू; ‘न्हाई’-‘पीडब्ल्यूडी’च्या निष्काळजीने जीव धोक्यात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मानराज पार्क ते खोटेनगर मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम रविवारी सायंकाळी सुरू होताच या मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. दररोज तब्बल एक लाखांहून अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर वाहतूक एकाच बाजूने वळविण्यात आल्याने रात्रीपासूनच मोठी कोंडी झाली. विशेष म्हणजे पर्यायी समांतर रस्त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य मार्ग बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी नागरिकांसह रात्री महामार्गावर ठिय्या आंदोलन करून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडले. प्रभाग क्रमांक ८ चे भाजप नगरसेवक अमर जैन आणि शिवसेना नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू झाले. नगरसेविका पती राहुल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकही आंदोलनात सहभागी झाले. तब्बल अडीच तास आंदोलन सुरू राहिल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ‘न्हाई’चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनीही आंदोलनस्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नियोजनशून्य काम मुख्य रस्ता बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्ग पूर्ण क्षमतेने तयार करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. न्हाई आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा व बेजबाबदार नियोजनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला. खड्ड्यांतून वाहतूक गिरणा पुलासह शहरातील सुमारे आठ किलोमीटर महामार्गाच्या व्हाइट टॉपिंग काँक्रिटीकरणासाठी तब्बल ५६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, खोटेनगर ते मानराज पार्क या सध्या सुरू असलेल्या एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूंची वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने खड्डे चुकविताना अपघाताचा धोका वाढला आहे. याच परिसरात ऑगस्ट २०२४ मध्ये खड्डा चुकविताना महिला व मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. तसेच अडीच महिन्यांपूर्वी खोटेनगर स्टॉपजवळ तरुणाचा अपघात झाला होता. चौकट दीड महिना रस्ता राहणार बंद मानराज पार्क ते खोटेनगर उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाला १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुमारे ३० दिवस क्युरिंगसाठी रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे जवळपास दीड महिना या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर राहणार असून, पर्यायी रस्ते आधी पूर्ण करून त्यानंतरच मुख्य मार्गाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांनी केली. चौकट समांतर रस्त्यावर वीज खांब, झाडांचा अडथळा महामार्गावरील मानराज पार्क ते सकृती अपार्टमेंटपर्यंतचा समांतर रस्त्याच्या मध्ये असलेले वीजखांब तसेच झाडे आहे. हे अडथळे काढल्यास वाहनधारकांना या समांतर रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करता येणार आहे. त्यामुळे न्हाई व सार्वजनीक बांधकाम विभागाने त्वरित हे अडथळे दूर करावे, अशी मागणी नगरसेविका प्रतिभा देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com