कसून सराव, फिटनेसवर विशेष लक्ष

कसून सराव, फिटनेसवर विशेष लक्ष
Published on
मेन आवश्‍यक सर्व लोगो व चौकट घ्यावी -- फोटो : H28377 नाशिक : ‘सकाळ प्रीमियर लीग’ स्‍पर्धेसाठी कसून सराव करताना केबीएच योद्धा संघाचे खेळाडू. ------------ कसून सराव, फिटनेसवर विशेष लक्ष ‘सकाळ प्रीमियर लीग’साठी केबीएच योद्धा संघ सज्‍ज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : ‘सकाळ’तर्फे आयोजित बहुप्रतिक्षित ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग’ स्पर्धेत केबीएच योद्धा संघानेही आपली दावेदारी सादर केली आहे. संघाकडून प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनाखाली मैदानात कसून सराव केला जातो आहे. याशिवाय संपूर्ण स्‍पर्धा कालावधीत खेळाडूंनी उत्‍कृष्ट कामगिरी करावी, या उद्देशाने त्‍यांच्‍या फिटनेसवर विशेष लक्ष दिले जाते आहे. कबड्डीमध्ये शारीरिक ताकदीसोबत मानसिक स्थैर्य, संयम, एकाग्रता आदी कौशल्‍यांची आवश्‍यकता भासते. चुरशीच्‍या क्षणांमध्ये आपल्या निर्णयक्षमतेची कसोटी लागते. या पार्श्वभूमीवर केबीएच योद्धा संघाकडून रणनीती आखली जाते आहे. रोज सकाळ आणि सायंकाळ असे दोन सत्रांमध्ये सराव केला जातो आहे. यावेळी खेळाडू एकमेकांशी समन्‍वय साधतांना, सांघिक कौशल्‍य विकसित करण्यावर भर देत आहेत. याशिवाय सुदृढ राहाण्यासाठी सोबत व्‍यायाम, तसेच इतर विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. सरावावेळी चढाईतील बारकावे, उचितरित्‍या वेळ साधणे, चपळतेने प्रतिस्‍पर्धांवर मात करणे, भक्‍कम पकड आदी तंत्रांवर भर दिला जातो आहे. एकमेकांमध्ये सराव सामने घेतांना, चांगल्या बाबींचे आकलन केले जाते आहे. त्‍याचवेळी कुठल्‍या खेळाडूमध्ये काय त्रृटी राहात आहेत, याचाही आढावा घेतला जातो आहे. संघाच्‍या व्‍यवस्‍थापनाकडूनदेखील खेळाडूंना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाते आहे. तसेच उत्‍कृष्ट कामगिरी करण्याच्‍या अनुषंगाने प्रोत्‍साहित केले जाते आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्‍मविश्‍वास उंचावला असून, आपण या स्‍पर्धेत उत्‍कृष्ट कामगिरी करु, असा दावा या संघाच्‍या खेळाडूंकडून केला जातो आहे. ---कोट फोटो : H28358 दोन वेळा सराव करतांना, संघात समन्‍वय वाढविण्यावर भर दिला जात आहे. खेळाडूंच्‍या आहारावरही विशेष लक्ष असून, त्‍यांचा फिटनेस जपला जातो आहे. सर्वांची मेहनत बघताना आपण या स्‍पर्धेत चांगली कामगिरी करू असा विश्‍वास आहे. ‘सकाळ प्रीमियर लीग’द्वारे चांगले व्‍यासपीठ उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. - किशोर राजगुरु, प्रशिक्षक, केबीएच योद्धा. --------कोट फोटो : H28361 नियमित सरावामुळे संघाच्‍या सर्व खेळाडूंमध्ये आत्‍मविश्‍वास दिसतो आहे. कौशल्‍य उंचावण्यासह एकमेकांमध्ये आणखी समन्‍वय कसा वाढविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्पर्धेत सहभागाविषयी आम्‍ही सर्व उत्‍सुक आहोत. - स्‍वयंम माळोदे, कर्णधार, केबीएच योद्धा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com