विज्ञान नाट्यात प्रथम

विज्ञान नाट्यात प्रथम
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 28364 विरदेल (ता. शिंदखेडा) : शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धेत प्रथम देवकर विद्यालयाच्या संघातील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर. -- देवकर विद्यालय विज्ञान नाट्यात प्रथम -- नेपथ्य व संहितेमुळे जिल्हास्तरासाठी निवड सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव विरदेल (ता. शिंदखेडा) येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयात पार पडला. या स्पर्धा महोत्सवात देवकर विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे आगामी जिल्हास्तरावरील महोत्सवासाठी विद्यालयाच्या संघाची निवड झाली. - मुख्याध्यापक जे. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उपक्रम समिती प्रमुख आर. ए. चित्ते यांनी प्रास्ताविक केले. महोत्सवात पाच संघांनी सहभाग नोंदवला होता. उत्कृष्ट सादरीकरण, वेशभूषा, अभिनय, नाट्यसंहितेची मांडणी, अत्याधुनिक नेपथ्य आणि वेळेचे नियोजन या सर्व बाबींमुळे देवकर विद्यालयाचा संघ अव्वल ठरला. या नाटकाची संहिता सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. एच. ठाकूर यांनी लिहिली असून, स्काऊटमास्टर सी. एस. निकम व गाईड कॅप्टन ज्योती निकवाडे यांनी मार्गदर्शन केले. शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलचा संघ उत्तेजनार्थ ठरला. स्पर्धेचे परीक्षण सुधाकर माळी व व्ही. ए. बेहेरे यांनी केले. विज्ञानसंघाचे तालुका उपाध्यक्ष एन. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विज्ञानसंघाचे सचिव संजय गोसावी यांनी आभार मानले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. बी. देवकर, उपाध्यक्ष धनंजय देवकर, सचिव ॲड. भरत देवकर आदींनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com