धुळे ः टुडे २ साठी
--
तीन किंवा चार कॉलमसाठी फोटो क्रमांक ः 28365
धुळे : आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिरात विद्यार्थ्यांना गणवेश वितरणावेळी उपस्थित प्रा. डॉ. न. म. जैन, सुलोचना अग्रवाल, सूर्यप्रभा जैन, डी. डी. डोंगरे, सुधीर बडगुजर, अस्मिता शिंदे व शिक्षक.
--
जैन पब्लिक ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश
-
धुळ्यातील आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिरात उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : दिव्यांग आणि निराधारांच्या सेवाक्षेत्रात गेल्या ४४ वर्षांपासून सातत्याने योगदान करणाऱ्या स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टतर्फे येथील भगवा चौकातील (कै.) आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिरातील बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. जैन ट्रस्टच्या बांधिलकीच्या या उपक्रमाची आर्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाने प्रशंसा केली.
-
संस्थेचे अध्यक्ष सुधीर बडगुजर अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टच्या देणगीदार सुलोचना विजय अग्रवाल प्रमुख पाहुण्या होत्या. जैन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रा. डॉ. न. म. जैन, प्रा. सूर्यप्रभा जैन, प्रा. डी. डी. डोंगरे, मुख्याध्यापिका अस्मिता शिंदे, तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित होते. ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रा. डॉ. जैन यांनी ट्रस्टच्या ४४ वर्षांच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. गणवेशासाठी अनुदान नसलेल्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूनगंड येऊ नये म्हणून ट्रस्टतर्फे शालेय गणवेश वितरित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दानशूर सुलोचना अग्रवाल यांनी आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिराने दिलेल्या संस्कारांमुळेच अनेक ख्यातनाम व्यक्ती घडल्याचे प्रतिपादन केले. प्रा. सूर्यप्रभा जैन यांच्या हस्ते सौ. अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डोंगरे यांच्या हस्ते गणवेशाच्या रकमेचा धनादेश बंग रेडिमेड क्लॉथ स्टोअर्सचे संचालक सुशील बंग यांना सुपूर्द करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत झाले. मुख्याध्यापिका शिंदे यांनी प्रास्ताविक केले. लेखनिक आरती अहिरे यांनी आभार मानले.
-