पान २ वर हा लेख घ्यावा
यतींद्र पगार - NSK26H28375
प्रशांत बैरागी - NSK26H28379
विकासाच्या दूरदृष्टीचे नेते
--------------------
यतींद्र पगार-पाटील
जायखेडा जिल्हा परिषद गटात यतींद्र पाटील यांनी केलेल्या लोकोपयोगी दर्जेदार रचनात्मक कामांमुळे जिल्हा परिषदेचा आदर्श गट अशी जायखेड्याची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.
- प्रशांत बैरागी, नामपूर
जायखेडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कार्यकाळात एखाद्या आमदाराला लाजवेल, अशी विकासकामे करून त्यांनी विकासाची गंगाच जणू मतदारसंघात आणली आहे. जायखेडा येथे कोट्यवधी रुपयांच्या विनियोगातून अत्याधुनिक सुविधायुक्त डीलक्स रुमसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे कामकाज प्रगतिपथावर आहे. जायखेडा येथील दावल शहा बाबा, महादेव मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. उत्राणे, भिमाशंकर, जायखेडा, करंजाड येथे वधुपित्यांच्या सोयीसाठी मंगल कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. जायखेडा गटातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची निर्मिती, गावोगावी स्मशानभूमीचे अत्याधुनिक बांधकाम करून ग्रामपंचायतींचे आर्थिकदृष्ट्या सशक्तीकरण व्हावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
उत्राणे (ता. बागलाण) हे त्यांचे मूळगाव. त्यांना विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड होती. उत्राणेचे सरपंच ते जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत यतींद्र पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची एकहाती सत्ता आहे. उत्राणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या २०२२ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यतींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी विकास पॅनलने सर्व १३ जागांवर विजय मिळवून प्रतिस्पर्धी पॅनलचा दारुण पराभव केला.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून यतींद्र पाटील यांनी जायखेडा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् केला आहे. त्यांनी गटात पाणंद रस्त्यांचे जाळे निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. जायखेडा गटातील अनेक गावांमध्ये झाडे झुडपे, काटेरी बाभळी, नाले आदींच्या अतिक्रमणातून अनेक शेतशिवारांच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोटबेल येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एम्पथी फाउंडेशन, जिल्हा परिषदेचा निधी, लोकसहभाग यांच्या वतीने सुमारे एक कोटी रुपयांच्या विनियोगातून बांधण्यात आलेल्या शालेय इमारत दिमाखात उभी आहे. तसेच आसखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे.
श्रीपुरवडे (ता. बागलाण) येथील ग्रामदैवत भीमाशंकर मंदिरास शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत यतींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला असून मंदिर परिसरात विकासकामे पूर्ण झाली आहेत. यतींद्र पाटील यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिराचा कायापालट झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंजूर निधीतून मंदिर परिसरात पर्यटन निवास बांधणे, विश्रामगृह बांधणे, जलतरण तलाव बांधणे, स्वच्छतागृह व घाट बांधणे अशी कामे सुरु आहेत. नामपूर येथील नववसाहतीना जोडणाऱ्या नळकस रस्त्याचे सुमारे एक कोटी रुपयांच्या विनियोगातून दर्जेदार काँक्रिटीकरण झाले असून गेल्या तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संभाजीनगरमध्ये रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. नामपूर येथील ग्रामदैवत शनिमंदिराच्या सभामंडपाचे कामही त्यांच्याच निधीतून झाले आहे. आदर्श चौकातील ऋणमुक्तेश्वर मंदिराच्या बाजूला सामाजिक सभागृह बांधले आहे.
यतींद्र पाटील-पगार यांनी मतदारसंघातील गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून गावांना नवसंजीवनी दिली आहे. उत्राणे गावात सुमारे ६५ लाख रुपयांच्या विनियोगातून पाटील यांच्या कल्पकतेतून ग्रामपंचायतीची आदर्श वास्तू उभी राहिली आहे. तसेच उत्राणे गावात बांधलेल्या मंगल कार्यालयामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. जायखेडा गटातील श्रीपुरवडे पॅटर्नची तालुक्यात चर्चा आहे. विविध गावांमधील नाल्यांवर बांधण्यात आलेल्या साखळी बंधाऱ्यांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यांनी गटात केलेल्या जलसिंचनाच्या कामांमुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. ग्रामपंचायत इमारती, चौक सुशोभीकरण, कांक्रीटीकरण, रस्ते, सामाजिक सभागृह, स्मशानभुमीशेड, सोलर स्ट्रीट लाइट, वॉटर स्टोअरेज टैंक, संरक्षक भिंत, ग्रीन जीम, अशी विकास कामांची गंगा त्यांनी जायखेडा गटात आणली आहे. त्यांच्या विकासकामांची दखल घेत जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने ''राज्यस्तरीय आदर्श जिल्हा परिषद सदस्य'' पुरस्काराने माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुण्यात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.