NSK26H28373
जळगाव : महापौर दीपमाला काळे यांना रोटरीचे मानद सदस्यत्व देताना अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे. शेजारी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, अनिल कांकरिया, स्वाती ढाके.
--
महापौर दीपमाला काळे यांना
रोटरी क्लबचे मानद सदस्यत्व
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : रोटरी क्लबच्या सदस्यत्व विस्तार उपक्रमांतर्गत शहराच्या महापौर दीपमाला काळे यांना रोटरी क्लब जळगावचे सन्मानपूर्वक मानद सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आले.
येथील गणपतीनगरातील रोटरी भवनात झालेल्या नवीन सदस्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, सहप्रांतपाल अनिल कांकरिया, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात महापौरांना मानद सदस्यत्व, तर डॉ. रोनीत पाटील, सिद्धार्थ प्रभुदेसाई व अशोक धूत यांना माजी प्रांतपाल भामरे यांच्या हस्ते रोटरी क्लब जळगावचे अधिकृत सदस्य म्हणून सदस्यत्व प्रदान करण्यात आले. रोटरी सदस्यत्वाची शपथ माजी अध्यक्ष राघवेंद्र काबरा यांनी दिली.
महापौर काळे यांनी बोलताना रोटरी परिवारात सहभागी होण्याची मला सुवर्णसंधी लाभली आहे. त्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर जळगावसाठी रोटरी व महापालिका एकत्र येऊन प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉ. प्रदीप जोशी यांनी परिचय करून दिला. कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी आभार मानले.