राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत बदल

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत बदल
Published on
राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत बदल स्थानिक कलाकार म्हणून द्यावा लागणार पुरावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : सांस्कृतिक विभागाने हौशी मराठी, बालनाट्य (प्राथमिक), हौशी हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्य (अंतिम) या स्पर्धांच्या पारितोषिक, सादरीकरण तसेच दैनिक भत्ता यामध्ये गेल्या वर्षी वाढ केली होती. परंतु स्पर्धेत बक्षिसाच्या मोहापोटी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्रावर जाऊन नाटक सादर करणाऱ्या बाहेरच्या संस्था तसेच स्पर्धकांना सांस्कृतिक विभागाने यंदा अटकाव केला आहे. ज्या जिल्ह्यात स्पर्धेचे केंद्र आहे. तेथील स्थानिक हौशी नाट्य संस्था आणि स्थानिक रहिवाशी कलाकारांना नाटक सादर करता येईल. त्यात नाटकातील सर्व कलाकार हौशी असावेत आणि त्या नाट्य संस्थेचे अधिकृत सभासद असावेत. त्यासाठी स्पर्धकांना रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड तसेच सर्व कलाकार त्याच जिल्ह्यातील आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड किंवा इतर सरकारी रहिवासी पुरावा जोडणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे नोकरी/शिक्षणासाठी बाहेर असणाऱ्या कलाकारांना दुसऱ्या जिल्ह्यात राहत असेल, तर तसा सबळ पुरावा अर्जासोबत जोडावा लागणार आहे. त्याशिवाय त्याला स्थानिक कलाकार मानले जाणार नाही. फाेटाे (28380) का करावा लागला बदल? हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील २५ केंद्रांवर, तर बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दहा केंद्रांवर घेण्यात येते. हौशी मराठी व बालनाट्य स्पर्धेच्या प्रत्येकी एका केंद्रावर अंतिम फेरी होते. बक्षिसांची रक्कम वाढल्यामुळे बाहेरच्या संस्थांचा हस्तक्षेप तसेच बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने आधीच पारितोषिक विजेत्या किंवा अनुभवी संस्था/कलाकार इतर जिल्ह्यांच्या केंद्रांवर जाऊन नाटके सादर करीत असल्याने स्थानिक कलाकारांवर अन्याय होत होता. त्यातून जिल्ह्यात स्थानिक संस्थांची संख्या कमी असल्याने तेथे बाहेरचे कलाकार येऊन बक्षिसे घेऊन जायचे आणि स्थानिक नवोदित कलाकारांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी सोलापूर, अकोला ठिकाणच्या कलाकारांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. तत्पूर्वी या संदर्भात राज्यातील स्पर्धा समन्वयकांची बैठक झाली होती. त्याची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाने यंदाच्या नियमावलीत हा महत्त्वाचा बदल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com