भटके- विमुक्त दिवस उत्साहात साजरा

भटके- विमुक्त दिवस उत्साहात साजरा
Published on
पान एक -------------------- 28386 नंदुरबार : येथे भटके विमुक्त दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित श्रावण चव्हाण, सुनीता ताईचेकर, रघुनाथ बेलदार, रणजीत राजपूत, रवी गोसावी आदी. भटके- विमुक्त दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. ३१ : भटके - विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे साहाय्यक संचालक यांच्यामार्फत भटके -विमुक्त दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात त्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय बंजारा क्रांतिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास घुली ग्रामपंचायत उपसरपंच सुनीता तमाईचेकर, रघुनाथ बेलदार, रामकृष्ण मोरे, रणजितसिंग राजपुत, सुपडू खेडकर, महेंद्र खेडकर, आर.डी. मोरे, रवींद्र गोसावी, राकेश तमायचेकर, मेहता जाधव, संजय साठे, प्रेमचंद चव्हाण, छगन पिसाळ, धनराज कातोरे, रणजित चव्हाण, किशोर कोळेकर, बंटी नेतलेकर, काजल मच्छले, सपना बाटुंगे, अविनाश चव्हाण, ॲड.विठ्ठल पथारिया, बाळू ठेलारी उपस्थित होते. व्याख्याते डॉ.प्रा. रविंद्रकुमार गोविंदराव बावने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे साहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे, प्रदिप वसावे, निरिक्षक, दिलीप कोकणी, निरिक्षक, विशाल पाटील, लिपिक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान समाजाच्या कला, संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com