कचरा संकलन, पाणीपुरवठाप्रश्‍नी संताप

कचरा संकलन, पाणीपुरवठाप्रश्‍नी संताप
Published on
धुळे टुडे २ साठी ॲंकर... --- फोटो- NSK26H28389 धुळे : महापालिकेच्या महासभेत बोलतांना सदस्या वैभवी दुसाने. --- स्वच्छ- सुंदर शहर कागदावर, प्रत्यक्षात कचराच --- महासभेत सत्ताधारी-विरोधकांचा संताप; बारापत्थर- गुरुशिष्य स्मारक रस्ता रुंदीकरणास संमती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : स्वच्छ-सुंदर धुळे दिसत नाही, सर्वत्र कचरा पाहायला मिळतो, आता नगरसेवकांनी घंटागाडी चालवायची अशी वेळ आली आहे, नागरिक म्हणतात तुम्हीच घंटागाडी चालवा अशा उद्विग्न भावना महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी सदस्यांकडून व्यक्त झाल्या. तर कचरा संकलन व अस्वच्छतेप्रश्नी मुख्य स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक यांच्यामुळे दुरवस्था झाल्याची कबुली खुद्द मनपा आयुक्तांनी दिल्याचे चित्र महासभेत पाहायला मिळाले. महापालिकेची सर्वसाधारण महासभा सोमवारी (ता. ३१) सकाळी अकराला महापालिकेत झाली. या सभेत शहरात दैनंदिन कचरा संकलनासाठी २० घंटागाड्या खरेदीचा विषय होता. या विषयाच्या अनुषंगाने कचरा संकलन, अस्वच्छता, पाणीपुरवठा या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी सतंप्त भावना व्यक्त केल्या. सत्ताधारी भाजप सदस्या वैभवी दुसाने, प्रतीक कर्पे, कल्पना महाले यांनी याप्रश्‍नी संताप व्यक्त केला. भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार यांनी प्रभागातील दुषित पाणीपुरवठ्याची समस्या मांडली. आयुक्त श्री. कापडणीस यांनी सदस्यांच्या भावनेशी मी सहमत असल्याचे म्हणत मुख्य स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता निरिक्षकांमुळे ही दुरवस्था झाल्याचे सांगितले. तसेच, शहरात किमान चार ठिकाणी कचऱ्याचे प्रायमरी कलेक्शन सेंटर हवेत. यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. दरम्यान, २० घंटागाड्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. बारापत्थर रोड रुंद होणार शहरातील बारा पत्थर ते गुरु- शिष्य स्मारकादरम्यानचा रस्ता १८ मीटर रुंदीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला. या विषयावर नगरसेवक शाहबाज शाह यांनी कोणत्या बाजूची जागा घेणार अशी विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी शासकीय आस्थापनांकडील जागा घेतली जाईल, असे स्पष्ट केले. सदस्य जावेद बिल्डर यांनी रस्ता रुंदीकरणाऐवजी वन-वे ट्रॅफीक पर्यायाचा विचार व्हावा, अशी मागणी केली. संकुलांबाबत चौकशी मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांचे भाडेपट्टा निश्चिती, नूतनीकरण, हस्तांतरण व भाडे आकारणीचा विषय मंजूर करण्यात आला. या विषयावर बोलतांना सदस्य सुनील बैसाणे यांनी मनपा मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व आर. आर. पाटील संकुलात कर वसुलीत संगनमताने पाच ते दहा कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप केल. त्यावर या विषयावर अतिरिक्त आयुक्तांना चौकशीचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले. सदस्य बोरसे यांनीही व्यापारी संकुलातील गाळे हस्तांतरणात जवळपास १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुनश्च केला. याप्रश्नी आपण गुन्हे आर्थिक शाखेकडे यापूर्वीच तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रदीप बैरागी यांनी गाळे परस्पर विकले जातात. तसे करता येते का अशी विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी मनपाच्या परवानगीशिवाय असे करता येत नाही, असे स्पष्ट केले. विविध विषय मंजूर प्रवेशद्वार, रस्त्याची कमान, घाट, प्राथमिक शाळा, चौक, कॉलनी, जलकुंभ, रुग्णालय आदींच्या नामकरणाचे विषय मंजूर करण्यात आले. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारणे, डॉ. के. एम. दुगल स्मृती समितीस सामाजिक व जनकल्याणकारी प्रकल्प उभारण्यास नाममात्र भाड्याने जागा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, मोहाडी गट क्रमांक १४२ मधील स्मशानभूमीतील अतिरिक्त जागा गवळी समाज व बाल दफनभूमीसाठी निश्‍चित करणे आदी विषयांनाही मंजुरी देण्यात आली. --- ...चौकट... सोनवणेंनी फोडली जलवाहिनी सभेत चर्चेदरम्यान सत्ताधारी सदस्य नागसेन बोरसे यांनी पाणीपुरवठ्याचे काम काढून घेतल्यामुळे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी अक्कलपाडा योजनेची जलवाहिनी फोडल्याचा गंभीर आरोप केला. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com