पान-१ साठी
----------------
फोटो आहेत.
NSK26H28396
त्र्यंबकेश्वर ः श्री त्र्यंबकेश्वराची कुशावर्तावर स्नानासाठी काढण्यात आलेली पालखी मिरवणूक.
-----------
NSK26H28404
त्र्यंबकेश्वर ः तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त फेरीसाठी आलेल्या भाविकांनी फुलून गेलेल्या शहरातील गल्ल्या.
---------
NSK26H28405
त्र्यंबकेश्वर ः फेरीत सहभागी झालेले आबालवृद्ध.
-------
३०-२
‘बम भोले’ने ब्रह्मगिरी दुमदुमली;
तीन लाख भाविकांची प्रदक्षिणा, मंदिरे भाविकांनी गजबजली
-------------------
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता.३१ : ‘बम भोले’, ''हर हर महादेव''च्या जयघोषात सुमारे तीन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त रविवारी सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची अलोट गर्दी जमली होती.
नाशिकहून एसटी महामंडळाच्या बसद्वारे भाविक जव्हार फाट्यापर्यंत पोहोचत होते. खासगी वाहने खंबाळे, अंबोली व पहिणे येथील तात्पुरत्या पार्किंगमध्ये लावून तेथून बसने भाविकांना त्र्यंबकेश्वरला आणले जात होते. कुशावर्त तीर्थावर स्नान करून भाविक मेनरोड, पेगलवाडी, पहिणेबारी, तळेगाव, सापगाव आणि गणपतीबारी मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करत होते. मार्गावर विविध संस्था व समाजसेवकांकडून फराळ, चहापाणी आणि फळांचे वाटप करण्यात आले. यंदा प्रदक्षिणेत महिलांची संख्या लक्षणीय होती.
गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून टप्प्याटप्प्याने भाविकांना पुढे सोडण्याची योजना आखली, ज्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी दुपारी तीनला त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी नेण्यात आली. दिवसभर ब्रह्मगिरी पर्वतावर आणि ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरांतील अन्य शिवमंदिरेही भाविकांनी गजबजली होती.
----------------