२८४०८
नाशिक : सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम अंतर्गत महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ विक्री दालनाला भेट दिल्यानंतर महापौर हिमगौरी आडके, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपआयुक्त सुवर्णा दखणे आदी.
महिला बचत गटांच्या
अन्न दालनाला नाशिककरांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमा निमित्त नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील २० स्वयंसहायता महिला बचत गटांनी उभारलेल्या खाद्यपदार्थ विक्री दालनाला नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकाराने बचत गटांसाठी विशेष विक्री दालनाची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि उपआयुक्त सुवर्णा दखणे यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महिला बचत गटांनी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सलग तीन दिवस स्वच्छ, सुरक्षित आणि ताज्या अन्नपदार्थांची मेजवानी दिली. महापौर आडके आणि आयुक्त खत्री यांनी प्रत्येक दालनाला भेट देऊन उत्पादनांची पाहणी करीत महिलांचे कौतुक केले. या यशस्वी नियोजनामागे शहर अभियान व्यवस्थापक संदीप भोसले, संतोष निकम, रंजना शिंदे, पल्लवी वक्ते आणि समुदाय संघटक तुषार बोरसे, संदीप कोठेकर, विशाल पाटील, सुनीता कुमावत, संगीता इंगळे, पल्लवी श्रीमाळी, सोनी सोनसळे, विजया चौधरी आणि गोदाई शहर स्तर संघाच्या अध्यक्षा यामिनी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.