फोटो : H28409
मलेशिया : प्रा. सुनील पाटील यांचा सन्मान करताना मान्यवर.
--
प्रा. सुनील पाटील
यांचा मलेशियात सन्मान
नाशिक, ता. ३१: महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था स्पेक्ट्रम ॲकॅडमीचे संचालक प्रा. सुनील पाटील यांना क्वालालंपूर, मलेशिया येथे आयोजित इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह समीट ॲन्ड ॲवॉर्ड्स (आयआयएसए) २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच मेडिकल आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि नवोन्मेष क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमास भारताचे राजदूत असिफ अयुब, संयुक्त राष्ट्राचे भागीदारी आणि समन्वय राजदूत डॉ. साहिल सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच स्नेहशिश दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी रिलायन्स एवीएशन, इसरा नूर टर्कर, मिस युनिव्हर्सल, तुर्कीस्थान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या सुजादा बशीर, या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. २५ वर्षांपासून स्पेक्ट्रम ॲकॅडमी महाराष्ट्रभर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे कार्य करत आहे. ॲकॅडमीच्या शैक्षणिक योगदानाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा घेण्यात आली आहे. संस्थेला यापूर्वीही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.