अब्दुल मुतलीब कॅम्पस

अब्दुल मुतलीब कॅम्पस
Published on
हा लेख पान १ वर घ्यावा. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे -------------------- अब्दुल मुतलीब कॅम्पस लेखक : डॉ. तारिक देशमुख -NSK26H28415 ----- मालेगाव परिसरातील अल्पसंख्याक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अब्दुल मुतलीब कॅम्पसने शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून या शैक्षणिक संकुलाची वाटचाल सुरू आहे. - डॉ. तारिक देशमुख, मालेगाव प्राथमिक शिक्षणापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे माध्यमिक, डी.एड., बी.एड. तसेच विविध उच्च शिक्षण संस्थांच्या निर्मितीपर्यंत विस्तारला. कॅम्पसमध्ये फार्मसीसह आरोग्यविषयक विविध अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. आरोग्यसेवा आणि बांधिलकी मालेगाव येथे आरोग्यविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांबरोबरच परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे उपक्रमही राबविले जातात. केएमई सोसायटीचे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय तपासणी, उपचार आणि आवश्यक मार्गदर्शन व ब्लड बँक उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बळ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, बंगळुरू यांसारख्या शैक्षणिक व औद्योगिक केंद्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. अभ्यासक्रमासोबतच करिअर नियोजन, रोजगाराच्या संधी, स्पर्धात्मक परीक्षा आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. रोजगाराभिमुख शिक्षणावर भर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी विविध कंपन्या व संस्थांशी संपर्क ठेवला जातो. कॅम्पस इंटरव्ह्यू, प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यविकास उपक्रम आणि प्लेसमेंट मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळत आहे. नवीन अभ्यासक्रमांसह विस्तार बदलत्या काळानुसार उच्च शिक्षणाच्या नव्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम यामुळे कॅम्पसचा शैक्षणिक विस्तार सुरू आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे डॉ. तारिक देशमुख यांनी सांगितले. अब्दुल मुतलीब कॅम्पसची ही शैक्षणिक वाटचाल केवळ संस्थेच्या प्रगतीपुरती मर्यादित न राहता परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला दिशा देणारी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com