सवलत प्रवासासाठी आजपासून स्‍मार्टकार्ड अनिवार्य

सवलत प्रवासासाठी आजपासून स्‍मार्टकार्ड अनिवार्य
Published on
सवलत प्रवासासाठी आजपासून स्‍मार्टकार्ड अनिवार्य महिला व ज्येष्ठ नागरिकांना कार्डद्वारेच मिळणार तिकिटात सवलत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जारी केलेल्‍या एनसीएमसी स्‍मार्टकार्डशिवाय प्रवास करताना महिला, ज्‍येष्ठ नागरिक प्रवाशांना खिसा हलका करावा लागणार आहे. मंगळवार (ता.१) पासून सवलतीच्‍या तिकिटात प्रवासासाठी महामंडळातर्फे कार्ड बंधनकारक केले आहे. या कार्डाशिवाय सवलतीचे तिकीट दिले जाणार नसल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांतील सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांसाठी एससीएमसी कार्ड देण्याची मोहीम एसटी महामंडळाने हाती घेतली आहे. सद्यःस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरु आहे. आगामी काळात इतर सर्व सवलतधारक प्रवाशांनाही टप्प्याटप्प्याने हे कार्ड बंधनकारक केले जाणार आहे. एनसीएमसी कार्डच्या नोंदणीकरणासाठी व वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. या संस्थेची नियुक्ती केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी आगार, बसस्थानके तसेच आगाराच्या हद्दीबाहेर अधिकृत एजंट्समार्फत हे कार्ड उपलब्ध करून दिले आहे. प्रवाशांना प्रवास करताना गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या बस वाहकांना कार्डचे टॉप-अप करण्याचे अधिकार व जबाबदारी दिली आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली महामंडळाने यापूर्वीच जारी केली आहे. महामंडळाच्या वाहतूक खात्याने राज्यातील सर्व विभागीय नियंत्रक व प्रादेशिक व्यवस्थापकांना पत्र पाठवून आपल्या अखत्यारीतील सर्व आगार व्यवस्थापक, चालक-वाहक व वाहकांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com