फोटो : NSK26H28417
नंदुरबार : ‘चावरा डान्स फेस्टा’मध्ये सहभागी राजे शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थीनी.
-------
‘चावरा डान्स फेस्टा’मध्ये
राजे शिवाजी विद्यालय तृतीय
नंदुरबार, ता. १ : येथील चावरा स्कूल नंदुरबार येथे रोटरी क्लब नंदुरबार आयोजित ‘चावरा डान्स फेस्टा’मध्ये श्री. चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना विजयी चषक व रोख तीन हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
बालशहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘चावरा डान्स फेस्टा’ यामध्ये ‘शहीद शिरीषकुमार मेहता जन्मदिवस’ या थीमवर डान्स स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार येथील २५ शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये जुनियर आणि सिनियर असे दोन गट करण्यात आले होते. राजे शिवाजी विद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा बोरसे, टीना प्रजापत, जागृती गिरासे, वैभवी पाटील, खुशी मोरे, नूर फातिमा युसुफ पिंजारी, पूनम भिल, खुशमती नगराळे, निशा कुमावत, जयश्री शिंदे यांनी सीनियर गटातून आपला डान्स परफॉर्मन्स सादर करून संपूर्ण जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा विद्या पाटील, नंदुरबार जिल्हा संस्थाचालक संघटनेचे सचिव युवराज पाटील, मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक केले.