धुळे ः टुडे १ साठी
--
मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेला वेग
-
संख्या १७६१ होणार; मदत कक्षासह हेल्पलाइन सुरू
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले असून, त्यानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एक हजार ७५२ वरून वाढून १ हजार ७६१ होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
-
मतदारांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक विधानसभा मतदारसंघ स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. हे कक्ष सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत कार्यरत राहणार आहेत. मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) ०२६२-२८८७१६ किंवा टोल फ्री क्रमांक १९५०, साक्री विधानसभा ०२५६८-२४२३०८, धुळे ग्रामीण विधानसभा ९४२३४९४६७० / ९०४९२९१४२१, धुळे शहर विधानसभा ०२५६२-२९८०१६, शिंदखेडा विधानसभा ८०९५६३१०१९ / ७९७२०९८३२७ शिरपूर विधानसभेसाठी ०२५६३-२५५०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
-
अपिलाची तरतूद
तसेच बीएलओशी संपर्क साधण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत असमाधान असल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या तरतुदीनुसार प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल.
-
नाव नोंदणीचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार तसेच ज्यांचे गणनापत्रक संकलित झाले नाही अशा नागरिकांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी विहित नमुन्यात अर्ज करून मतदार यादीत नाव नोंदवावे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक पात्र नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
विधानसभानिहाय मतदानकेंद्र रचना
साक्री : ४०२ वरून ४०५
धुळे ग्रामीण: ३८८ वरून ३९०
धुळे शहर : २८८ (जैसे थे)
शिंदखेडा : ३३८ (जैसे थे)
शिरपूर : ३३६ वरून ३४०