ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा १ठार ४ जखमी;

ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा १ठार ४ जखमी;
Published on
NSK26H28423 जळगाव : अपघातात चुराडा झालेली कार. ------------ भरधाव ट्रकची कारला धडक; एक ठार पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातात चार गंभीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : पाळधी- तरसोद बायपासवर सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीदरम्यान सुसाट ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिंदखेडा (ता. रावेर) येथील ईश्वर महाजन यांची प्रकृती आजारामुळे खालावल्याने त्यांचा मुलगा रामचंद्र रविवारी रात्री कारने (एमएच ४८, पी ०७५५) त्यांना नाशिकला घेऊन निघाला. सोबत नातेवाईक शांताराम पाटील, निखिल पाटील व जितेंद्र सोपारकर होते. रात्री तरसोद-पाळधी बायपासवरील असोदा-ममुराबाददरम्यान पाळधीकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने कारला समोरून धडक दिली. यात ईश्वर महाजन यांच्यासह चौघे गंभीर जखमी झाले. रामचंद्र महाजन यांच्या डोक्याला व पायाला, निखिल पाटील यांना कपाळावर, शांताराम पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव येत होता, तर चालक जितेंद्र सोपारकर यांच्या छातीला मुकामार लागला होता. महामार्गावरून जाणाऱ्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. चालक ताब्यात पोलिसांनी घटनास्थळाहून धडक देणाऱ्या ट्रकसह चालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रामचंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com