ॲंकर
शहर टुडे पान चारसाठी
------
NSK26H28371
जळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गौरविण्यात आलेल्या खेळाडूंसमवेत अंजली पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, डॉ. मृणालिनी फडणीस, टी. डी. पाटील, प्रशांत जगताप, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर.
-------
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ४२ खेळाडूंचा गौरव
-----
राष्ट्रीय पदकविजेत्यांच्या मातांचा ‘वीर जिजामाता’ पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : येथील ‘केसीई’चे एकलव्य क्रीडा संकुल व क्रीडा भारती जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा, एकलव्य क्रीडा संकुलातील क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ नुकतेच उत्साहात पार पडला. यात ४२ खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
येथील एकलव्य क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील, केसीईचे सह-सचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, अकॅडमिक डायरेक्टर डॉ. मृणालिनी फडणीस, कोषाध्यक्ष टी. डी. पाटील, क्रीडा भारती विभागीय अध्यक्ष व सहमंत्री, तथा जिल्हा पदाधिकारी प्रशांत जगताप यांच्यासह मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. रणजीत पाटील आदी उपस्थित होते.
मातांचा पुरस्काराने सन्मान
क्रीडा भारतीच्या जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रीयस्तरावर पदकप्राप्त करणारे हर्षिता पाटील (शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत रजत पदक), हिमाली पाटील (शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक) व मुक्तेश सोनवणे (शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक) या खेळाडूंसोबतच त्यांच्या माता वैशाली रणजित पाटील, सुनीता पद्माकर पाटील व प्रतिभा गोविंद सोनवणे यांना ‘वीर जिजामाता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
४२ खेळाडूंचा सन्मान
राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून सकाळी सातला पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा केसीई सोसायटीच्या सर्व शाखा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व एकलव्य क्रीडा संकुलातील ४० क्रीडा प्रशिक्षक व प्रशिक्षिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पदक प्राप्त करणाऱ्या ४२ खेळाडूंचा गौरव करण्यात आला.