मेनफिचर
शहर-जिल्हा टुडे पान चारसाठी
------------
NSK26H28429, NSK26H28430
जळगाव : बसमध्ये ‘एनसीएमसी’ कार्डमध्ये तांत्रिक दोषामुळे येणाऱ्या समस्या.
-----------------
‘एनसीएमसी’ कार्डचा पहिलाच दिवस कसोटीचा
----
प्रवाशांसह वाहकांची तारांबळ; बसमध्ये कार्ड रीड न होणे, नियमांबाबत संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी एक सप्टेंबरपासून ‘एनसीएमसी’ कार्डद्वारे प्रवास बंधनकारक केला आहे. मात्र, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी कार्ड रीड न होणे, ईटीआयएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येणे व अनेक प्रवाशांना नियमांची माहिती नसणे, यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जळगाव एसटी विभागासह राज्यातील अन्य विभागांतही अशाच तक्रारी समोर येत आहेत.
एसटी महामंडळाकडून मागील काही महिन्यांपासून सवलतधारकांना ‘एनसीएमसी’ कार्डची नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, अनेक प्रवाशांना एक सप्टेंबरपासून कार्ड बंधनकारक होणार असल्याची माहितीच नसल्याने बसमध्ये तिकीट काढताना वाहक व प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले.
रीड न झाल्यास काय?
पहिल्याच दिवशी एका महिला प्रवाशाकडील ‘एनसीएमसी’ कार्डमध्ये तब्बल ७४९ रुपयांचे बॅलन्स होते. मात्र, वाहकाच्या मशीनमध्ये कार्ड रीड झाले नाही. त्यामुळे संबंधित महिलेला पूर्ण तिकीट काढावे लागले. यावरून महिलेने संताप व्यक्त केला. कार्डमध्ये पुरेसा रिचार्ज असतानाही तांत्रिक कारणामुळे सवलत न मिळाल्यास वाहकाने नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
...पण नोंदणीची पावती
काही प्रवाशांकडे कार्ड नोंदणी केल्याची पावती आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्ड उपलब्ध नसल्यास त्यांना कोणत्या प्रकारचे तिकीट द्यायचे, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. कार्ड मशीनला लावणे, रीड करणे व तिकीट प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत असल्याने गर्दीच्या बसमध्ये वाहकांचीही दमछाक होत आहे.
तांत्रिक अडचणी दूर करा
दरम्यान, कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतील किंवा कार्ड रीडच होत नसेल, तर प्रवाशाला पूर्ण तिकीट द्यायचे की अन्य पर्याय उपलब्ध करून द्यायचा, याबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणी होत आहे. एनसीएमसी कार्डला विरोध नसून, त्याची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून वाहकांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
-------
कोट
मंगळवारपासून ‘एनसीएमसी’ कार्डच्या अंमलबजावणीला सुरू झाली आहे. परंतु, पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणी समोर येत असून, यात तिकीट काढण्याच्या मशिनला कनेक्टिव्हीटी न मिळणे, तर अनेकांच्या कार्डमध्ये टॉप ॲप नसल्याने अडचणी येत आहेत. या यंत्रणेतील सॉफ्टेवअरमध्येही काम सुरू असून, लवकर ही यंत्रणा सुरळीत होईल.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, जळगाव एसटी विभाग.
------------
चौकट
---
एनसीएमसी कार्डची आकडेवारी
सवलत प्रकार....................नोंदणी झालेले...........ॲक्टिव्हेशन
ज्येष्ठ नागरिक...................६४,५४२..............५४,५१२
अमृत ज्येष्ठ नागरिक...........८५,९७२...............७२,१५७
महिला सन्मान योजना.........५,१८,१५७...............४,०९२७
इतर.............................८,९२८..................७,०१५
एकूण...........................६,७७,५९९.............५,४२,९५७