नाशिक, धुळ्यात सीएनजी २ रुपयांनी महागला

नाशिक, धुळ्यात सीएनजी २ रुपयांनी महागला
Published on
नाशिक, धुळ्यात सीएनजी दोन रुपयांनी महागला नवीन दर ९८.५० रुपये प्रतिकिलो, ग्राहकांचा खिसा होणार हलका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) जाहीर केला आहे. त्यानंतर मंगळवार (ता. १)पासून आता सीएनजीचा नवा दर ९८.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. घरगुती पाइप गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आला नसल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. दरवाढीमुळे वाहनचालकांना अधिकचा खिसा हलका करावा लागणार आहे. यासंदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार जुलैपासून पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. जागतिक ऊर्जा व्यापारासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हॉर्मुझची सामुद्रधुनी येथील एलएनजी जहाजांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे जागतिक स्तरावर स्पॉट एलएनजीचे दर संकटापूर्वीच्या तुलनेने जवळपास दुपटीने वाढले आहेत. आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांमध्ये नैसर्गिक वायू साठवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या घाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीचा पुरवठा आणखी कमी झाला आहे. भारतात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कच्च्या वायूचा मोठा हिस्सा महागड्या आयातीवर अवलंबून आहे, असे एमएनजीएलतर्फे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com