चार किलो अंमली पदार्थासह संशयीताला अटक

चार किलो अंमली पदार्थासह संशयीताला अटक
Published on
NSK26H28449 जळगाव : संशयिताबरोबर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, नितीन गणापुरे, निरीक्षक राहुल गायकवाड व पथक. --- NSK26H28446, NSK26H28447 व NSK26H28448 जळगाव : स्कूटरच्या डिकीत आढळलेले ड्रग्स व गांजाचे पॅकेट. दुसऱ्या छायाचित्रात जप्त इफेड्रीन ड्रग्सची खेप. --- चार किलो अंमली पदार्थासह संशयिताला अटक --- जळगाव पोलिसांची कारवाई; दोन किलो इफेड्रिन, दोन किलो गांजा जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : येथील गुन्हे शाखेने तब्बल दोन किलो इफेड्रीन ड्रग्स व दोन किलो गांजाची तस्करी होतानाच छापा टाकला. यात ११ लाख १७ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालासह ड्रग्स पेडलरला अटक केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नियोजनानुसार, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक बबन अव्हाड, उपनिरीक्षक अशोक काळे, दीपक जगदाळे, संतोष पवार यांनी सापळा रचून ही कारवाई केली. नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरच सोमवारी (ता. ३१) मध्यरात्री ड्रग्सची डिल होणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यावरून एमआयडीसी व गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दर्ग्यासमोरील रस्त्यावरून येणाऱ्या स्कूटीस्वारास अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्याला ताब्यात घेतले. स्कूटीची (एमएच १९, ईके ४३०५) तपासणी केली असता, डिकीत काही संशयास्पद पॅकेट आढळली. स्कूटीचालक नूर मोहंमद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) याला ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संतोष पवार तपास करीत आहेत. इफेड्रिन काय? - इफेड्रिन मज्जासंस्थेचे उत्तेजक व सिम्पाथोमिमेटिक रासायनिक उत्पादन आहे. वैद्यकीय क्षेत्राशिवाय बॉडी बिल्डिंग व अलर्ट राहण्यासाठी ‘इफेड्रिन’चा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com