धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H28437
धुळे : सिंधूरत्नज इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधींसह शिक्षक, शिक्षिका.
सिंधुरत्नज् इंग्लिश स्कुलमध्ये
विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : शहरातील साक्रीरोड परिसरातील सिन्धुरत्नज् एसव्हीसी (महात्माजी) इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी प्रतिनिधी व हाउस कॅप्टन यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारी, शिस्त व संघ भावना विकसित व्हावी या उद्देशाने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
मुख्याध्यापक अमीर खान अध्यक्षस्थानी होते. उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान, पर्यवेक्षक चैतन्य भंडारी उपस्थित होते. कार्यक्रमात हेड बॉय म्हणून आदित्य ठाकरे तर हेड गर्ल म्हणून रश्मी निकम यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे तक्षशिला, विक्रमशिला, पंचशिला व नालंदा या चार हाउसेससाठी शैक्षणिक वर्ष २०२६- २७ साठी हाउस लीडर्सची निवड करण्यात आली. तक्षशिला हाउससाठी परिस बागूल व सिद्धि देसले, विक्रमशिलासाठी वेदांत गायकवाड व प्रणिती पिंपळे, पंचशिला हाउससाठी पुष्कर बागूल व कनिष्का परदेशी तर नालंदा हाउससाठी प्रतिक पाटील व हिमाक्षी देसले यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सॅशे व बॅचेस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात नंतर सर्व इयत्तांसाठी मॉनिटर निवडण्यात आले.
वर्गनिहाय मॉनिटर असे
नर्सरी- कियान पाटील, ज्युनिअर केजी- लवेश लुंड, सिनिअर केजी- नित्यांश तनेजा, पहिली- विराज जाधव, दुसरी- निशिका मेवानी, तिसरी- धैर्या वाघ, चौथी- शिवराज गावंदे, पाचवी- प्रतिक देसले, सहावी- ओजस वाघ, सातवी- पूर्वी शेलार, आठवी- सोनाक्षी गवांदे, नववी- प्रणित पाटिल, दहावी- नैतिक आहुजा. त्यानंतर नवनिर्वाचित हाउस लीडर्स व सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी निष्ठा, सत्यता, सन्मान व आपल्या शाळेची परंपरा उच्च स्तरावर ठेवण्याची शपथ घेतली. मारिया बोहरी यांनी सूत्रसंचालन केले.
---