​‘मविप्र’च्या नावे बनावट दस्तऐवजद्वारे २१ लाखांचा गंडा!

​‘मविप्र’च्या नावे बनावट दस्तऐवजद्वारे २१ लाखांचा गंडा!
Published on
​‘मविप्र’च्या नावे बनावट दस्तऐवजाद्वारे २१ लाखांचा गंडा सरचिटणीस ॲड. ठाकरेंच्या बनावट स्वाक्षऱ्या, बनावट आदेशही सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : येथील नामांकित मराठा विद्याप्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या नावाचा, छायाचित्राचा आणि संस्थेच्या लेटरहेडसह बनावट शिक्क्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा डाव उघडकीस आला आहे. संस्था आणि कायदेशीर सल्लागारात सात कोटी रुपयांचे शुल्क ठरल्याचा बनावट सामंजस्य करार (एमओयू) व नोटरी दस्त तयार करून जिल्ह्यातील एका नागरिकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मुख्य संशयित भूषण शेवाळे याच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार, १५ जुलै २०२५ मध्ये मधुकर मुरलीधर जाधव आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष जाधव (रा. वडाळीभोई, ता. चांदवड, जि. नाशिक) हे मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात भेटण्यासाठी आले. त्यांनी ॲड. ठाकरे यांच्यासमोर संस्थेच्या नावे असलेले एक ‘नॉन-डिक्लोजर ॲग्रीमेंट’ आणि एमओयू दाखवले. ​त्यानुसार, मविप्र संस्थेची गंगापूर रोडवरील जागा बँक ऑफ महाराष्ट्रकडे तारण ठेवून घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात, ‘डेट रिकव्हरी ट्रिब्युनल’ मुंबई येथे संस्थेची बाजू मांडण्यासाठी ‘बी. एस. असोसिएट्स’चे भूषण गमनराव शेवाळे याची लिगल असिस्टन्स म्हणून नेमणूक केल्याचे दर्शविण्यात आले होते. तसेच या कामासाठी तब्बल सात कोटी रुपयांची फी ठरल्याचेही या बनावट करारात नमूद करण्यात आले होते. अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही बनावट आदेश ॲड. ठाकरे यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता, संस्थेचे लेटरहेड, लोगो, बनावट शिक्के, त्यांचा संमतीशिवाय लावलेला फोटो आणि बनावट स्वाक्षरी वापरल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, अपर जिल्हाधिकारी (नाशिक) यांच्याकडील सेक्युरिटी केस क्र. ५२७/२०२४ चा बनावट आदेशही या संशयितांनी तयार केला होता. प्रत्यक्ष पाहणीत हा आदेश आयडीएफसी फर्स्ट बँक विरुद्ध एका खासगी व्यक्तीच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. ​२१ लाखांना गंडा; प्लॉटचे दिले आमिष संशयित भूषण शेवाळे याने जाधव पिता-पुत्रांना मविप्र संस्थेच्या जागेतून कमी दरात ५०० वारचा प्लॉट काढून देण्याचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात त्याने जाधव यांच्याकडून १५ लाख रुपये रोख आणि सहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे, असे एकूण २१ लाख रुपये उकळले. शेवाळे हा पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने जाधव हे मविप्र कार्यालयात खात्री करण्यासाठी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत. ...हे आहेत संशयित भूषण शेवाळे (रा. निकुंज अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक), अमोल एन. बिडवे, ॲड. अश्विनी एस. गायकवाड, बनावट एमओयू व नोटरी करून देणारा ॲड ए. आय. शेख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com