मविप्र सेवानिवृत्त सेवकांची शनिवारी वार्षिक सभा

मविप्र सेवानिवृत्त सेवकांची शनिवारी वार्षिक सभा
Published on
मविप्र सेवानिवृत्त सेवकांची शनिवारी वार्षिक सभा नाशिक, ता. १ ः येथील नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज निवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केली आहे. शनिवारी (ता. ५) दुपारी एकला गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे संघाचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सभेत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या संघाच्या ज्येष्ठ सभासदांचा मविप्र संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार केला जाईल. तसेच सभेत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये संघाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना निश्चित करणे, धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे सादर केलेले २००८-०९ ते २०१०-११ पासून २०२९-३० पर्यंतच्या मागील कालावधीतील सहा मंजूर फेरफार अर्जांची नोंद घेणे, सभासदांच्या मागणीनुसार संपूर्ण घटनेच्या दुरुस्तीचा मसुदा तयार करून मंजुरीसाठी धर्मदाय उपायुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय घेणे यांसह अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. उपस्‍थितीचे आवाहन उपाध्यक्ष अशोक देवकर, सचिव माणिकराव गोडसे, सहसचिव सुदाम आहेर यांच्‍यासह सर्व संचालक, स्‍वीकृत सदस्‍यांनी केले आहे. मविप्र सेवेतून निवृत्त झालेल्या, मात्र अद्याप संघाचे सदस्य नसलेल्या सेवकांची सभेपूर्वी सभासद नोंदणी करून घेतली जाणार असल्‍याचेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com