‘सकाळ श्रावणसरी’ आज बरसणार

‘सकाळ श्रावणसरी’ आज बरसणार
Published on
पान दोन ॲंकर ------------- (सोमवारी (ता.३१ ऑगस्ट)च्या मुख्य अंक पान दोन ॲंकरमधील दोन चौकटी घेणे) आज बरसणार ‘सकाळ श्रावणसरी’ मंगळागौरसह विविध स्पर्धांची रेलचेल; महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ः सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या महिलांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ श्रावणसरी’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता.२) दुपारी एकला सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका मंगल कार्यालयात हा महोत्सव रंगणार आहे. यानिमित्त मंगळागौरसह विविध स्‍पर्धांची रेलचेल असणार आहे. महिलांच्‍या कलागुणांना व्‍यासपीठ या उपक्रमातून मिळेल. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एल. जी. बांधानी हिंग हे असून, सहप्रायोजक निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, इंद्रिया-आदित्य बिर्ला ज्वेलरी आणि श्री धूतपापेश्वर लि. आहेत. हा महोत्सव ‘सकाळ-तनिष्का’ व्यासपीठाच्या सहकार्याने पार पडतो आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पहिल्या ५०० महिलांना ‘एल. जी. हिंग’तर्फे विशेष मोफत गिफ्ट दिले जाणार आहे. या महोत्सवांतर्गत महिलांसाठी पारंपरिक संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन श्रावणसरींचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे. --- कार्यक्रमाचा तपशील * वार व तारीख : बुधवार, २ सप्टेंबर २०२६ * वेळ : दुपारी १.०० वाजता * स्थळ : लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉलच्या समोर, लवाटे नगर, नाशिक. * नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : मनोरमा पाटील - ९५११७३३९२४ प्राची तिवडे - ८८८८४३९३५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com