कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी : तिघांवर गुन्हा दाखल

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी : तिघांवर गुन्हा दाखल
Published on
NSK26H28467 घुली : कारखान्यात तपासणी करताना कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता विनोद काळे, सहायक अभियंता विनोदकुमार आगरे, राकेश चौधरी. --- कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी --- दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १ : तालुक्यातील घुली शिवारातील दोन कारखान्यांमध्ये तब्बल ४७ लाखांची वीजचोरी ‘महावितरण’ने उघडकीस आणली. या प्रकरणी तीन जणांवर नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घुली शिवारात खुशबू ए. जैन यांच्या ॲल्युमिनियम पावडर कोटिंग कारखान्यात मेसर्स लाब्धी इंटर नावाने वीजजोडणी असून, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन आहे. महावितरणच्या नंदुरबार ग्रामीण-२ कक्षाचे सहायक अभियंता विनोदकुमार आगरे यांना या कारखान्यात वीजचोरी होत असल्याची माहिती मिळाली. २५ ऑगस्टला सायंकाळी नंदुरबार विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, नंदुरबार ग्रामीण-१ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद काळे, सहायक अभियंता विनोदकुमार आगरे, सहायक अभियंता राकेश चौधरी, बाह्यस्रोत तंत्रज्ञ चेतन भदाणे यांनी तेथे जाऊन पाहणी केली. विद्युत संच मांडणी तपासली असता, ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे वीजबिल यात तफावत दिसून आली. रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती, तर उर्वरित तीन केबल मीटरला न जोडता थेट अनेक विद्युत उपकरणे जोडल्याचे आढळले. या उपकरणांद्वारे ११५ एचपी (८५.७९ किलोवॅट) इतका वीजभार विद्युतभारित करून वीजचोरी होत होती. ग्राहकाने दोन लाख १३ हजार ६९२ युनिट वीज वापरून ४१ लाख ९२ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीच्या रकमेसह १७ लाख ७० हजार रुपये तडजोड रक्कम, असे एकूण ५९ लाख ६२ हजार ९३० रकमेचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून खुशबु ए. जैन व प्रकाश अशोक जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याच पथकाने घुली परिसरातील मेसर्स दक्ष इंटर (प्रो. आरती दीपक जैन, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन) ॲल्युमिनियम बफिंग मशीनच्या कारखान्यात तपासणी केली. ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे वीजबिल यात तफावत दिसून आली. रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती, तर विद्युत मीटरच्या इनकमिंग टर्मिनलला तीन केबल जोडून मीटर बायपास करून विविध विद्युत उपकरणे जोडलेली आढळली. विविध उपकरणांचा २० एचपी (१४.९२ किलोवॅट) इतका वीजभार विद्युतभारित करून वीजचोरी होत होती. २८ हजार ३४६ युनिट वीज वापरून ५ लाख ४१ हजार ३४० रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीच्या रकमेसह ३ लाख ५० हजार रुपये तडजोड रक्कम, असे एकूण ८ लाख ९१ हजार ३४० रुपयांचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. याबाबत सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून आरती दीपक जैन व प्रकाश अशोक जैन या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com