टुडे ३ ॲंकर
NSK26H28468
जळगाव : शिवकॉलनीतील सर्वज्ञ महादेव मंदिरात महाआरती करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. पद्मनाभन महाराज, भक्तिप्रियदास स्वामी, नगरसेवक विशाल भोळे, अध्यक्ष मयूर गुर्जर आदी.
-------
सर्वज्ञ महादेव मंदिर श्रद्धा, सात्त्विकता अन् प्रसन्नतेचा संगम
पालकमंत्री गुलाबराव पाटील : हनुमान मंदिराची स्थापना, ‘संत कुटिया’चे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१ : येथील शिव कॉलनीतील सर्वज्ञ महादेव मंदिर परिसरात अध्यात्म, सात्त्विकता, स्वच्छता आणि सुंदरता यांचा येथे सुरेख संगम साधला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंदिर परिसराचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हनुमान मंदिराची स्थापना, ‘संत कुटिया’चा अनावरण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील, प. पू. पद्मनाभन महाराज (रामेश्वर), प. पू. भक्तीप्रियदास स्वामी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. साधू-संत आणि भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी नगरसेवक विशाल भोळे ट्रस्टचे मार्गदर्शक रत्नाकर झांबरे, अध्यक्ष मयूर गुर्जर, उपाध्यक्ष शेखर सोनार, सचिव प्रीतम गुजर यांच्यासह शिवपुरी गोसावी, किशोर चौधरी, सुनील जोशी, भगवान पाटील, अभय कुलकर्णी, हरिप्रसाद कुशवाह, श्यामराव वालडे, महेश महाजन, के. एम. बापू, कमलाकर पाटील, अनिल पाटील, सुधीर सोनार, प्रवीण कोलते, दिनेश शिंपी, जितेंद्र झांबरे, किरण गोसावी, केदारनाथ ठाकूर, रमेश कुशवाह, शरद बोरसे, भगवान वालडे, पंकज कुशवाह, सुनील पाटील, दीपक गुलाब बोरसे, प्रदीप महाले, अनिरुद्ध कुशवाह, दुर्गेश साळुंखे, बंटी बोरसे, राहुल पाटील, प्रणय झांबरे, पीयूष कुशवाह व कैलास चौधरी यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सेवा दिली.