धुळे खरीप पीक कर्ज वाटप

धुळे खरीप पीक कर्ज वाटप
Published on
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- खरीप पीक कर्जवाटपाची ५७ टक्केच उद्दीष्टपूर्ती! -- जिल्हाधिकाऱ्यांकडून पात्र लाभार्थ्यांपर्यंत अर्थसहाय्य पोहोचविण्याचे बॅंकांना निर्देश -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, स्वयंसहाय्यता गट तसेच विविध समाजघटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिकाधिक कर्जवाटप करावे. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळण्यात अनावश्यक अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेऊन विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्ह्यास २०२६- २०२७ मध्ये खरीप पीक कर्ज वितरणाचे ८९६.५२ कोटींचे उद्दिष्ट निश्चित झाले. पैकी ३१ जुलैअखेर ५१४ कोटी ३८ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित झाले असून ही ५७.३८ टक्के उद्दिष्टपूर्ती असल्याचे त्यांनी सांगितले. - जिल्हास्तरीय बॅकर्सच्या सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी विसपुते यांच्या अध्यक्षतेत झाली. जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जयेश बळकटे, उमेदचे प्रकल्प संचालक राजन पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. - १४-१ योजनांची उद्दीष्टपूर्ती बँकांच्या शाखांमध्ये विविध कर्ज योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि कर्ज मंजुरी प्रक्रियेची माहिती नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने सूचना फलकावर प्रदर्शित करावी. कर्ज प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित अर्जदारांना त्याची स्पष्ट माहिती द्यावी. पात्र प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत. बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करून योजनांची उद्दिष्टपूर्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. - १४-१ ५७ टक्के वितरण जिल्ह्यासाठी २०२६- २०२७ मध्ये खरीप पीक कर्ज वितरणाचे ८९६.५२ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पैकी ३१ जुलैअखेर ५१४ कोटी ३८ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले असून ही ५७.३८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी खरीप पीक कर्जाचे २३४ कोटी ८७ लाखांचे उद्दिष्ट असून, २०५ कोटी ७३ लाखांचे वितरण करण्यात आले आहे. ही कामगिरी ८७.६० टक्के आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेनेही ७८.३० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. काही बँकांची कामगिरी चांगली असून, उर्वरित बँकांनीही कर्जवाटपाला अधिक गती देऊन खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे. नवीन पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पात्र कर्ज खात्यांच्या नूतनीकरणालाही प्राधान्य द्यावे. पीक कर्ज वितरणात मागे असलेल्या बँकांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जपुरवठा पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. - १४-१ ...कोट... १४-१ फोटो क्रमांक ः 28474 १४-१ जिल्ह्यातील विविध समाजघटकांच्या आर्थिक सक्षमीकरणात बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसाय, शेती तसेच शिक्षणासाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कर्ज उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक कर्ज सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. ज्या बँकांचे विविध योजनांमधील कर्जवाटप कमी आहे, त्यांनी संबंधित प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करून कर्जवाटप वाढवावे. - भाग्यश्री विसपुते, जिल्हाधिकारी, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com