महापालिका रुग्णालयात ''मॉडेल औषध भांडार'' उभारणार

महापालिका रुग्णालयात ''मॉडेल औषध भांडार'' उभारणार
Published on
महापालिका रुग्णालयात आता ''मॉडेल औषध भांडार'' ई-सुश्रुत प्रणाली लागू करण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषध व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ''मॉडेल औषध भांडार'' उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच रुग्णसेवा अधिक सुसूत्र करण्यासाठी शासनाची ''ई-सुश्रुत'' प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मंगळवारी (ता. १) अतिरिक्त आयुक्त रंजन यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. शहरात स्वाईन फ्लू आणि डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषध भांडार, प्रयोगशाळा आदी विभागांना भेट दिली. रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ, उपचार व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी चौकशी करत आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले. प्रस्तावित अतिदक्षता विभागात रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सुसज्ज अग्निशमन प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक रीना ढिकले आणि बांधकाम व विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने इंदिरा गांधी रुग्णालयातील प्रलंबित बांधकाम व विद्युतविषयक कामे ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश रंजन यांनी दिले. त्यानंतर त्यांनी तपोवन येथील प्रस्तावित नवीन रुग्णालयाच्या बांधकामाचीही पाहणी करून कामाच्या गतीचा आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com