धुळे : टुडे १ साठी...
--
फोटो क्रमांक : 28459
धुळे : जिल्हा परिषदेत विविध मागण्यांसाठी संघटीत ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी.
--
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर
--
मूक मोर्चा : शिवरे प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : शिवरे (जि. जळगाव) येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या हुल्लडबाजीमुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या येथील जिल्हा शाखेतर्फे सोमवारी (ता. १) कामगार कल्याण भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
-
मोर्चात राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी व जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते. शिवरे येथील ग्रामसभेत झालेल्या गोंधळामुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. ‘सध्या ग्रामसभा नव्हे, राजकीय कुस्त्यांचा आखाडा बनला आहे,’ असे निषेधदर्शक फलक हातात घेऊन महिला व पुरुष ग्रामपंचायत अधिकारी या मूक मोर्चानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले.
-
१४-१
विविध मागण्या
शिष्टमंडळाच्या निवेदनात म्हटले आहे, की ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. तसेच वर्षातून १० ते १२ ग्रामसभांऐवजी केवळ एकच ग्रामसभा घ्यावी, संवेदनशील ग्रामसभांना विनामूल्य पोलिस संरक्षण द्यावे, ग्रामसभेचे बेकायदेशीर चित्रीकरण करणाऱ्यांवर बंदी आणावी. कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण विभागांच्या विशेष ग्रामसभांची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवावी आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पारदर्शकपणे राबवावी. शिवाय उडाणे (ता. धुळे ), झेंडेअंजन व नवे लोंढरे (ता. शिरपूर) ग्रामपंचायतींमधील प्रकरणांतील दोषींवरही तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली.
-