धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 28489
धुळे : जप्त गावठी कट्टा, काडतुसासह पकडलेला संशयित तरुण आणि कारवाई करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.
-
गावठी कट्ट्यासह तरुणाला बेड्या
-
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; उमर्टीहून शस्त्र खरेदीची कबुली
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने वलवाडी परिसरातून गजाआड केले. मंजूर शाह डबू शाह (रा. गवळीवाडा, मोगलाई, धुळे) असे संशयिताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलवाडी येथील जय संतोषी माता कॉलनीजवळ नदीकाठच्या पुलाशेजारील रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली. संशयिताकडून ४० हजार किमतीचा देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीनसह आणि एक हजार किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान संशयिताने सुमारे दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील उमर्टी येथून हे शस्त्र खरेदी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके तसेच अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर, आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाने केली.