फायर ऑडीट बंधनकारक

फायर ऑडीट बंधनकारक
Published on
धुळे टुडे १ साठी ॲंकर... --- वैद्यकीय आस्थापनांचे फायर ऑडीट बंधनकारक --- धुळे महापालिका; कार्यवाहीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; अन्यथा कारवाई --- सकाळ वनृत्तसेवा धुळे, ता. १ : अमरावती येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय आस्थापनांच्या अग्निसुरक्षेबाबत महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना धुळे शहरात घडू नये, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना शहरातील सर्व शासकीय, खासगी तसेच मनपा मालकीच्या वैद्यकीय आस्थापनांचे अग्निसुरक्षा ऑडीट (फायर ऑडीट) करण्याबाबत निर्देश दिले. धुळे महापालिका क्षेत्रात नोंदणीकृत १७९ खासगी वैद्यकीय आस्थापना असून, मनपा मालकीच्या पाच वैद्यकीय आस्थापना आहेत. या सर्व आस्थापनांनी दरवर्षी फायर ऑडीट करणे आवश्यक आहे. रुग्णालये व दवाखान्यांमध्ये आग प्रतिबंधक तसेच आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक सर्व अग्निसुरक्षा उपाययोजना कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने मनपा आरोग्य अधिकारी व अग्निशमन अधिकारी यांच्यामार्फत सर्व संबंधित वैद्यकीय आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या वैद्यकीय आस्थापनांनी अद्याप फायर ऑडीट केलेले नाही, त्यांनी नोंदणीकृत अग्निशमन व जीवसंरक्षक परिनिरीक्षकामार्फत आपल्या इमारती व परिसरातील अग्निसुरक्षा उपाययोजनांचे ऑडीट करून घेणे तसेच आवश्यक त्रुटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा कारवाई फायर ऑडीट ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही न करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित आस्थापना सीलबंद करण्याची कार्यवाहीदेखील केली जाईल असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. तसेच फायर ऑडीट न करणे अथवा अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणे याबाबत शासन नियमांनुसार निर्धारित शुल्कावर शास्तीची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, केवळ नियमांचे पालन म्हणून नव्हे तर रुग्ण, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी सर्व वैद्यकीय आस्थापनांनी फायर ऑडीटची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com