‘राज्यनाट्य’मध्ये स्थानिक हौशी कलाकारांना अधिक संधी

‘राज्यनाट्य’मध्ये स्थानिक हौशी कलाकारांना अधिक संधी
Published on
स्थानिक कलाकारांसाठी नाट्यस्पर्धेचे व्यासपीठ अधिक सक्षम राज्य नाट्य महोत्सवाच्या नियमावलीत सुधारणा; परजिल्ह्यातील कलाकारांच्या सहभागाला निर्बंध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत आयोजित हौशी नाट्यस्पर्धांमध्ये स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्यानुसार, स्पर्धेत सहभागी होणारा कलाकार संबंधित स्पर्धा केंद्राच्या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक हौशी कलाकारांना स्पर्धेचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य तसेच दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे राज्यातील २४ केंद्रांवर आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांत हौशी नाट्यस्पर्धांमधील पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर काही ठिकाणी परजिल्ह्यातील कलाकार स्थानिक नाट्यसंस्थांच्या माध्यमातून अन्य केंद्रांवर सहभागी होत असल्याच्या तक्रारी सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. परजिल्ह्यातील कलाकारांच्या सहभागामुळे संबंधित जिल्ह्यातील स्थानिक हौशी कलाकारांच्या संधी मर्यादित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतील स्थानिक नाट्यसंस्थांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्थानिक कलाकारांना स्पर्धांमध्ये अधिक संधी मिळाव्यात आणि नवोदित हौशी कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. प्रवेशिका २५ सप्टेंबरपर्यंत राज्य नाट्यस्पर्धेसाठीच्या प्रवेशिका २५ सप्टेंबरपर्यंत mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत. राज्यातील अधिकाधिक हौशी कलाकार आणि नाट्यसंस्थांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com