पान तीन
-----------------
28488, 28487
नाशिक : शहरात मंगळवारी कोंडीत अडकलेले वाहनचालक. दुसऱ्या छायाचित्रात वाहतुक सुरळीत करताना पोलिस.
मोर्चाने वाहतुक कोंडी; पोलिसांची तारांबळ
नाशिक, ता. १ : आदिवासी विकास भवनावर आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी (ता.१) मोर्चा काढला. या मोर्चामुळे त्र्यंबक नाका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ याठिकाणी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. मोर्चा आदिवासी विकास भवनसमोर स्थिरावल्यानंतर सीबीएस ते अशोकस्तंभ रोडवरील वाहतूक सुरळीत झाली. तर गडकरी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मोर्चावेळी वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात असला तरी तारांबळ झाली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चाला गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झाली. मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमारमार्गे एमजी रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून सीबिएस सिग्नल, त्र्यंबक नाका येथून आदिवासी विकास भवनसमोर मोर्चा आला. मोर्चात हजारो विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
मोर्चा मार्गस्थ होत असताना त्र्यंबकरोडकडून येणारी व जाणारी वाहतूक खोळंबली. तसेच, सिबीएस चौकातही अशीच परिस्थिती होती. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. तर गडकरीकडून येणारी वाहतूक चांडक सर्कलमार्गे तर, त्र्यंबक नाक्याकडून येणारी वाहतूक खडकाळी सिग्नलमार्गे वळविण्यात आली.