वुशू स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदक

वुशू स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदक
Published on
NSK26H28516 नंदुरबार : सुवर्णपदकप्राप्त खेळाडूंसोबत सुषमा शाह, प्रशांत बागूल, भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, सुनील शाह, मनीष सनेर, जगदीश वंजारी, हेमचंद्र मराठे आदी. --- वुशू स्पर्धेत २१ खेळाडूंना सुवर्णपदक श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : नंदुरबार जिल्हा वुशू संघटनेच्या मान्यतेने आयोजित आठवी जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा नंदुरबार येथील एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडल्या. यात श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या २१ खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली. १४ वर्षे व १७ वर्षे मुलींच्या गटासह मुलांच्या विविध वजन गटांमध्ये श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. १४ वर्षे मुलींच्या गटात देवश्री अहिरे, हिमांशू चौधरी, जीविका माळी, यशस्वी गवळी, नंदिनी गवळी, जागृती न्याहाळदे, ऋतुश्री शिरसाट व खुशी निकुंभ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षे मुलींच्या गटात खुशी चव्हाण, मोक्षदा गवळी, रेवा गवळी, अनुष्का चौधरी, रोशनी नागरे व चंचल घुगे यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या गटात दिव्येश चव्हाण, मधुसूदन मराठे, नीरज देवरे, गुणवंत चौधरी, रितेश पाटील, प्रसाद कदमबांडे व अजय सकट यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडूंचे श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक सुषमा शहा, मुख्याध्यापक प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील व पर्यवेक्षक सुनील शहा यांनी कौतुक केले आहे. खेळाडूंना जगदीश वंजारी, मनीष सनेर व हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. नंदुरबार जिल्हा वुशू संघटनेचे सचिव रामा हटकर यांच्या संयोजनातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com