जिल्ह्यात डेंग्यूचे १३३, तर चिकुनगुनियाचे २२ रुग्ण

जिल्ह्यात डेंग्यूचे १३३, तर चिकुनगुनियाचे २२ रुग्ण
Published on
मेन फिचर ( या मेन बातमीजवळ डायफाइडची दुसरी बातमी घ्यावी) --------- (डेंगीचा डास व संबंधित चित्र वापरावे) शीर्षक पाऊस कमी, तरी ‘डेंगी’चा ताप वाढला जिल्ह्यात आठ महिन्यांत १३३ रुग्ण, २२ चिकुनगुनिया रुग्ण; आरोग्य विभाग सतर्क सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात डेंगी, चिकुनगुनियासह इतर साथीच्या आजारांचा धोका वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ऐनपूर येथे डेंगीचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाच्या डेंगी व रक्तजल अहवालानुसार गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात डेंगीचे १३३ रुग्ण, तर चिकुनगुनियाचे २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे पाणी देखील साचलेले नाही. तरी देखील वातावरण बदलामुळे आजारांचा फैलाव वाढलेला आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्‍ण वाढत आहेत. काही भागात साथरोगांचा फैलाव झालेला आहे. यामुळे आरोग्‍य विभाग सतर्क झाले असून संशयित रूग्‍णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यात काही १३३ रूग्णांचे अहवाल डेंगी पॉझिटिव्‍ही आले आहेत. चाळीसगाव डेंगीचे ‘हॉटस्पॉट’ आठ महिन्यांतील अहवालानुसार चाळीसगाव तालुक्यात डेंगीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. तालुक्‍यात ६७७ संशयित रुग्णांची नोंद झाली असून २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यात ६०५ संशयित रुग्णांपैकी सात जण पॉझिटिव्ह, तर रावेर तालुक्यात ५६८ संशयितांपैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. संशयित रुग्णांची संख्या मोठी असल्याने संबंधित भागांत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. ऑगस्टमध्ये १९ नवे रुग्ण ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्‍पत्ती होण्याची शक्यता असते. यामुळे ऑगस्ट महिन्यातच ७५१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. इन्‍फो ‘चिकुनगुनिया’चेही रुग्ण वाढताय जिल्‍ह्यात डेंगी व चिकुनगुनियाचा धोका वाढत आहे. जिल्‍ह्यात गेल्‍या आठ महिन्‍यात डेंगीचे १३३ रुग्‍ण आढळले आहेत. यासोबतच चिकुनगुनियाचा प्रभाव देखील वाढत असल्‍याचे दिसून येत आहे. कारण मागील आठ महिन्‍यात चिकुनगुनियाचे २ हजार २४४ संशयित आढळले असून यातील २२ रूग्‍ण पॉझिटिव्‍ह आढळून आले आहेत. ––––––––– चौकट डेंगी, चिकुनगुनियाचे आठ महिन्यांतील पॉझिटिव्‍ह रुग्‍ण (कंसात संशयित) तालुका.........डेंगी.........चिकुनगुनिया अमळनेर.....७ (६०५)....२ (२३३) पारोळा.......५ (१०४)....० (११) भडगाव......८ (१२१).....२ (६४) चाळीसगाव...२२ (६७७)...२ (३४४) पाचोरा........६ (१६४).....० (४५) एरंडोल....... ६ (२५०)....२ (६१) धरणगाव.....० (२११).....० (९१) चोपडा........१ (४३३).....३ (१६१) रावेर.........७ (५६८)......२ (१९६) यावल........२ (३९८).....० (२२१) मुक्‍ताईनगर... ५ (२५६)....१ (९४) जामनेर........३ (२९८).....१(१७९) भुसावळ......१ (१६७)......१ (२५६) जळगाव.......१३ (४७६)....३ (२६९) बोदवड.......१ (१६७)......० (७३) जळगाव मनपा....१९ (३४२)...२ (१६६) –––––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com