चित्तथरारक प्रात्‍येक्षिकांनी वेधले लक्ष

चित्तथरारक प्रात्‍येक्षिकांनी वेधले लक्ष
Published on
पान चार सेकंड मेन ----------------- 28523 नाशिकः भोसला सैनिकी विद्यालयाच्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पथसंचलन करताना रामदंडी. ---- चित्तथरारक प्रात्‍येक्षिकांनी वेधले लक्ष पद्मश्री के. पजनिवेल यांच्या उपस्थितीत भोसलाचा वर्धापन दिन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ः सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला सैनिकी विद्यालयाचा ८९ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता.१) साजरा झाला. कार्यक्रमास पद्मश्री के. पजनिवेल उपस्‍थित होते. रामदंडींनी सादर केलेल्‍या चित्तथरारक प्रात्‍येक्षिकांनी उपस्‍थित सर्वांचे लक्ष वेधले. प्रारंभी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीस माल्यार्पण केले. शाळेच्या इमारतीत वास्तुपूजन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम झाला. मान्‍यवरांनी भोसला सैनिकी विद्यालयाच्‍या औपचारिक संचलनात सहभाग घेतला. समर्थ मैदानावर शालेय ध्वज व कंपनी ध्वजांचे विधिवत पूजन झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या घोषपथक, अश्वपथकाच्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. शिस्त, आत्मविश्वास, साहस, नेतृत्व आणि संघभावनेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. याप्रसंगी संस्‍थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, कार्याध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि. संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य, सदस्य पराग कनेकर, आनंद देशपांडे, आशुतोष रहाळकर, नाना वाणी, ग्रुप कॅप्टन देवधर, विद्यालयाचे समादेशक कर्नल (निवृत्त) संदीप पुरी, प्रशासकीय समन्वयक संदीप म्हात्रे, मुख्य प्रशिक्षण अधिकारी कॅप्टन जितेंद्र कुमार मिश्रा आदी उपस्‍थित होते. पद्मश्री के. पजनिवेल यांनी कोदंडधारी श्रीराम यांच्या जीवनदर्शनाचा संदर्भ देत शौर्य, ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा यांचे महत्त्व स्पष्ट केले. दूरदर्शी डॉ. मुंजे यांनी ८९ वर्षांपूर्वी सैनिकी विद्यालयाची स्थापना करून पाहिलेले स्वप्न आजही विविध उपक्रमांतून साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन अभिराम गीद, श्रवण पाटील, साई पिसाळ, देव सोमय्या, विहान निंबाळकर आणि कौस्तुभ सोनवणे या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्राचार्य मेजर विक्रांत कावळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com